मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND A vs AUS A : पृथ्वी शॉने पकडला भन्नाट कॅच, पाहा VIDEO

IND A vs AUS A : पृथ्वी शॉने पकडला भन्नाट कॅच, पाहा VIDEO

भारत अ आणि ऑस्ट्रेलिया अ (India A vs Australia A) यांच्यातल्या सराव सामन्यात पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) याने भन्नाट कॅच पकडला.

भारत अ आणि ऑस्ट्रेलिया अ (India A vs Australia A) यांच्यातल्या सराव सामन्यात पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) याने भन्नाट कॅच पकडला.

भारत अ आणि ऑस्ट्रेलिया अ (India A vs Australia A) यांच्यातल्या सराव सामन्यात पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) याने भन्नाट कॅच पकडला.

सिडनी, 8 डिसेंबर : ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या भारतीय टीम (India vs Australia)चे काही खेळाडू टी-20 सीरिज तर काही खेळाडू सराव सामना खेळत होते. भारताच्या टेस्ट टीमचे काही खेळाडू आणि ऑस्ट्रेलियाच्या अ टीममध्ये (India A vs Australia A) सराव सामना पार पडला. ऑस्ट्रेलिया अ विरुद्धच्या या सराव सामन्यात उमेश यादव (Umesh Yadav) आणि रवीचंद्रन अश्विन(Ravichandran Ashwin) यांनी उत्तम प्रदर्शन करून टेस्ट टीममध्ये जागा मिळवणे नक्की केलं आहे. या सराव सामन्यात टीम इंडियाने पहिल्यांदा बॅटिंग करताना 9 विकेट गमावत 247 रन केल्या होते. त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या टीमने कॅमरुन ग्रीन(Cameron Green) याच्या शानदार शतकी खेळीच्या बळावर 8 विकेट गमावत 286 रन केले. ही मॅच ड्रॉ झाली, तरी अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा आणि ऋद्धीमान साहा फॉर्ममध्ये दिसले. भारताच्या पहिल्या डावात कर्णधार अजिंक्य रहाणे(Ajinkya Rahane) याने शानदार बॅटिंग करत 117 रन केले. तर चेतेश्वर पुजारा याने अर्धशतकी खेळी केली. दुसऱ्या इनिंगमध्ये ऋद्धीमान साहा यानेही अर्धशतक केलं. या सामन्यात पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) याला बॅटने कमाल दाखवता आली नसली, तरी त्याने फिल्डिंगमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली. शॉने टीम पेन (Tim Paine) याचा भन्नाट कॅच पकडला. ऑस्ट्रेलिया अ टीमच्या डावात कॅमरुन ग्रीन आणि टीम पेन यांची उत्तम पार्टनरशिप सुरु होती. भारताच्या बॉलरनी चांगली कामगिरी करत ओपनर विल पुकोवस्की (1) आणि जो बर्न्स (4) यांना स्वस्तात आउट करत चांगली सुरुवात केली होती. त्यानंतर मोहम्मद सिराज याने ऑस्ट्रेलिया अ चा कर्णधार ट्रेविस हेड याला आउट केले. मग अश्विन याने मार्क्स हॅरिस आणि निक मेडिंसन यांना आउट केले. त्यानंतर कॅमरुन ग्रीन आणि टीम पेन यांनी चांगली पार्टनरशिप करत ऑस्ट्रेलिया अ ला 200 रनपर्यंत आणले. त्यानंतर पृथ्वी शॉ याने टीम पेनचा एक अफलातून कॅच पकडत भारताला यश मिळवून दिले. उमेश यादवच्या 59 व्या ओव्हरमध्ये त्याने स्केअर लेगला एक शानदार कॅच पकडला. टेस्ट सीरिजसाठी भारतीय टीममध्ये फास्ट बॉलर म्हणून मोहम्मद शमी(mohammad shami) आणि जसप्रीत बुमराह(jasprit bumrah) या दोघांचं नाव निश्चित आहे, पण सध्या तिसरा बॉलर कोण असणार याची चाचपणी सुरु आहे. यामध्ये उमेश यादव याने शानदार कामगिरी करत 18 ओव्हरमध्ये 44 रन देत 3 विकेट घेतल्या तर मोहम्मद सिराजने (mohammad siraj) 19 ओव्हरमध्ये 71 रन देत 2 विकेट घेतल्या. उमेशने ओपनिंग बॅट्समन विल पुकोवस्की आणि जो बर्न्स यांना आउट केले, तर अश्विनने 19 ओव्हरमध्ये 58 रन देत 2 विकेट घेतल्या. दरम्यान, ऑस्ट्रेलिया अ च्या कॅमरुन ग्रीन याने आपला फॉर्म कायम राखत 173 बॉलमध्ये 10 फोरच्या मदतीने नाबाद 114 रन केले. त्याने टीम पेन याच्या साथीने सहाव्या विकेटसाठी 104 रनांची पार्टनरशिप देखील केली. हे दोघं मैदानात येण्याआधी ऑस्ट्रेलिया अ संघाची अवस्था 98 रनवर 5 आउट अशी झाली होती.
First published:

पुढील बातम्या