World Cup: गेली 23 वर्ष भारत 'या' संघाविरुद्ध अपराजीत राहिला; आज काय होणार? West Indies | India | ICC world cup 2019

वर्ल्डकपमध्ये असा एक संघ आहे ज्याविरुद्ध भारताचा गेल्या 23 वर्षात पराभव झाला नाही.

News18 Lokmat | Updated On: Jun 27, 2019 08:19 AM IST

World Cup: गेली 23 वर्ष भारत 'या' संघाविरुद्ध अपराजीत राहिला; आज काय होणार? West Indies | India | ICC world cup 2019

मँचेस्टर, 27 जून: वर्ल्डकपमध्ये (ICC world cup 2019) नेहमी भारत-पाकिस्तान यांच्या सामन्यांची चा होते. पण याच स्पर्धेत असा एक संघ आहे ज्याविरुद्ध भारताचा गेल्या 23 वर्षात पराभव झाला नाही. होय भारताने (India National Cricket Team) वेस्ट इंडिज(West Indies National Cricket Team)विरुद्ध केल्या 23 वर्षात एकदाही पराभव स्विकारलेला नाही. भारताने वेस्ट इंडिज संघाविरुद्ध 8 सामने खेळले आहेत आणि त्यापैकी 5 सामन्यात विजय मिळवला आहे. या वर्ल्डकपमध्ये देखील आता भारत पुन्हा एकदा त्यांच्याविरुद्ध मैदानात उतरणार आहे. ज्या मैदानावर भारताने पाकिस्तानचा पराभव केला होता त्याच मैदानावर हा सामना होणार आहे.

वर्ल्डकपच्या इतिहासात आतापर्यंत वेस्ट इंडिजविरुद्ध भारताचे पारडे जड राहिले आहे. यावेळीच्या वर्ल्डकपमध्ये देखील भारताने आतापर्यंत शानदार कामगिरी केली आहे. असे असेल तरी वेस्ट इंडिज संघाकडे धक्का देण्याच्या क्षमता आहे. त्यामुळेच भारतीय संघाला या सामन्यात गाफिल राहून चालणार नाही.

1979मध्ये भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात वर्ल्डकपमधील पहिला सामना झाला होता. गुंडप्पा विश्वनाथ यांच्या 75 धावांच्या जोरावर भारताने 190 धावा केल्या होत्या. पण विजयाचे हे सोपे लक्ष वेस्ट इंडिजने 51.3 षटकात पार केले. वेस्ट इंडिजकडून गॉर्डन ग्रीनीज यांनी शतकी खेळी केली होती. 1983 वर्ल्डकपमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध खेळताना भारताने प्रथम फलंदाजीकरत 262 धावा केल्या होत्या. या सामन्यात यशपाल शर्माने 89 धावांची खेळी केली होती. उत्तरा दाखल वेस्ट इंडिजला 228 धावाच करता आल्या.

या दोन्ही संघांमधील तिसरा सामना केवळ भारतीय चाहते नाही तर संपूर्ण क्रिकेट जगाच्या लक्षात राहिला. 25 जून 1983 रोजी झालेल्या या सामन्यात भारताने वेस्ट इंडिजचा पराभव करत ऐतिहासिक असे विश्वविजेतेपद मिळवले होते. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करत केवळ 183 धावा केल्या होत्या. पण गोलंदाजीत मोहिंदर अमरनाथ आणि मदनलाल यांनी असे काही कमाल केली की वेस्ट इंडिजचे दिग्गज फलंदाज केवळ 140 धावात बाद झाले. भारताकडून वर्ल्डकपमध्ये झालेल्या या पराभवानंतर वेस्ट इंडिजला विजयासाठी 9 वर्ष वाट पहावी लागली. 1992च्या वर्ल्डकपमध्ये झालेल्या सामन्यात भारताने दिलेले 197 धावांचे लक्ष्य वेस्ट इंडिजने 5 गड्यांच्या मोबदल्यात पार केले.

Loading...

त्यानंतर 1996च्या वर्ल्डकपमध्ये ग्वालियर येथे झालेल्या सामन्यात वेस्ट इंडिजने केवळ 173 धावा केल्या होत्या. भारताने हा सामना 39.4 षटकात जिंकला. या सामन्यात सचिन तेंडुलकरने 70 धावांच्या खेळी केली होती. 1996च्या वर्ल्डकपनंतर या दोन्ही संघांची विश्वचषकातील लढत 15 वर्षांनी म्हणजे 2011मध्ये झाली. भारताने प्रथम फलंदाजीकरत 268 धावा केल्या. यात युवराज सिंगच्या 113 धावांच्या शतकी खेळीचा देखील समावेश होता. उत्तरादाखल वेस्ट इंडिजचा संघ 188 धावातच बाद झाला.

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात वर्ल्डकपमधील अखेरची लढत 6 मार्च 2015 रोजी झाली होती. या सामन्यात वेस्ट इंडिजने प्रथम फलंदाजीकरत 182 धावा केल्या होत्या. भारताने हे विजयाचे लक्ष्य 39.1 षटकात पार केले.

VIDEO: उकाड्यानं हैराण झालेल्या मुंबईकरांना दिलासा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 27, 2019 08:11 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...