गैरवर्तनामुळे टीम इंडियाच्या 'या' सदस्यावर BCCI करणार कारवाई?

गैरवर्तनामुळे टीम इंडियाच्या 'या' सदस्यावर BCCI करणार कारवाई?

भारतीय संघ वेस्ट इंडीज दौऱ्यावर असून दोन कसोटी सामन्यांची मालिका होण्यापूर्वी एका सदस्यावर गैरवर्तणुकीमुळे कारवाई केली जाण्याची शक्यता आहे.

  • Share this:

त्रिनिदाद, 14 ऑगस्ट : भारतीय क्रिकेट संघ सध्या विंडीज दौऱ्यावर आहे. भारताने टी20 मालिका जिंकली असून बुधवारी शेवटचा एकदिवसीय सामना आहे. दरम्यान, संघाचे प्रशासकिय व्यवस्थापक सुनील सुब्रमण्यम यांना बीसीसीआयच्या कारवाईला सामोरं जावं लागण्याची शक्यता आहे. अद्याप भारताची कसोटी मालिका बाकी आहे. याआधीच भारतीय संघाचे प्रशासकिय व्यवस्थापक सुनील सुब्रमण्यम यांना दौऱ्यावरून मायदेशी बोलवलं जाण्याची शक्यता आहे.

प्रशासकांच्या समितीमधील एक सदस्यानंसुद्धा म्हटलं होतं की, सुब्रमण्यम यांच्याकडून ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण होत नसल्याच्या तक्रारी येत आहेत. गेल्या वर्षी ऑस्ट्रेलिया दौऱा तसेच वर्ल्ड कपवेळी त्यांच्या कामाबद्दल नाराजी व्यक्त कऱण्यात आली होती. आता त्यांनी वेस्ट इंडीजमधील उच्चायुक्तांशी गैरवर्तन केल्याचं आढळून आलं आहे. या प्रकरणी बीसीसीआयकडून सुब्रमण्यम यांना इशारा देण्यात आला आहे.

त्रिनिदाद मध्ये भारताच्या उच्चायुक्तांनी सुब्रमण्यम यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. तेव्हा सुब्रण्यम यांनी उद्धटपणे मला विनाकारण मेसेज पाठवू नका असं उत्तर दिलं आहे. भारत सरकारतर्फे पाणी बचतीसाठी विराट कोहली आणि रोहित शर्माला जाहिरात करण्यासंदर्भात उच्चायुक्तांकडून सुब्रमण्यम यांच्याशी संपर्क करण्यात येत होता.

वर्ल्ड कपनंतरही बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीने व्यवस्थापक सुनील सुब्रमण्यम यांना फैलावर घेतलं होतं. व्यवस्थापकांनी खेळाडू नियमाचे उल्लंघन करत असताना सुब्रमण्यम यांनी आक्षेप का घेतला नाही? त्यांना फक्त संघाच्या सरावाकडे लक्ष देण्यासाठी पाठवलं नव्हतं. आता त्यांच्यावर कारवाई होऊ शकते.

असं धाडस करू नका, तलावात उडी मारणे तरुणाला पडले महागात, पाहा हा VIDEO

Published by: Suraj Yadav
First published: August 14, 2019, 2:27 PM IST
Tags: cricket

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading