मुंबई, 26 जानेवारी : भारत विरुद्ध वेस्ट इंडिज (India vs West Indies) यांच्यातील मालिकेला 6 फेब्रुवारीपासून सुरूवात होणार आहे. 3 वन-डे आणि 3 टी 20 सामन्यांची ही मालिका आहे. या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा लवकरच होणार आहे. दक्षिण आफ्रिकेतील निराशाजनक कामगिरीनंतर भारतीय टीममध्ये मोठे बदल होणार असून काही दिग्गजांना वगळले जाणार हे निश्चित आहे.
वेस्ट इंडिज विरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय टीमची निवड होण्यापूर्वी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. टीम इंडियाचा अनुभवी ऑफ स्पिनर आर. अश्विन (R. Ashwin) वेस्ट इंडिज विरुद्धच्या मालिकेतून माघार घेणार आहे. 'क्रिकबझ' नं हे वृत्त दिलं आहे. अश्विनचं तब्बल 4 वर्षांनी लिमिटेड ओव्हर क्रिकेटमध्ये पुनरागमन झालं आहे. पण आगामी काळात त्याच्यावर उपचार होणार असल्यानं तो मालिकेसाठी उपलब्ध नसेल, अशी माहिती आहे.
अश्विनसाठी खास प्लॅनिंग
भारतीय क्रिकेट टीमची निवड ही 25 जानेवारी रोजी होणार होती. पण टीम इंडियाचा हेड कोच राहुल द्रविड (Rahul Dravid) आणि निवड समितीचे काही सदस्य दक्षिण आफ्रिकेतून जवळपास 24 तासांचा प्रवास करून मंगळवारी घरी परतले आहेत. त्यामुळे निवड समितीची बैठक दोन दिवसांसाठी पुढे ढकलण्यात आली.
आगामी काळात होणारा टी20 वर्ल्ड कप आणि वन-डे वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाच्या नियोजनाचा अश्विन हा महत्त्वाचा भाग आहे. टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा (Rohit Sharma) अश्विनच्या समावेशासाठी खास आग्रही आहे. या दोन महत्त्वांच्या स्पर्धांसाठी अश्विन फिट राहावा म्हणून त्याचे वर्कलोड मॅनेजमेंट करण्यात येणार आहे. निवड समितीचे सदस्य आणि राहुल द्रविड यांच्यात या विषयावर चर्चा होईल, असे वृत्त आहे.
टीम इंडियाचा युवराज झाला बाबा! बाळाच्या जन्मानंतर सर्वांना केली खास विनंती
रोहित शर्मा (Rohit Sharma) हॅमस्ट्रिंग दुखापतीमुळे दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाऊ शकला नव्हता. आता वेस्ट इंडिजविरुद्धच्या सीरिजसाठी रोहितचं टीममध्ये पुनरागमन होईल. रोहित शर्माच्याच नेतृत्वात टीम इंडिया मैदानात उतरेल. दुसरीकडे दक्षिण आफ्रिका दौऱ्यात वनडे सीरिजमध्ये टीम इंडियाचं नेतृत्व केलेला केएल राहुल (KL Rahul) पुन्हा एकदा मधल्या फळीत दिसू शकतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.