INDvsWI T20 : भारताचा विंडीजवर 4 गडी राखून विजय

टी20 मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताच्या युवा गोलंदाजांच्या माऱ्यासमोर विंडीजची फलंदाजी गडगडली.

News18 Lokmat | Updated On: Aug 3, 2019 11:19 PM IST

INDvsWI T20 : भारताचा विंडीजवर 4 गडी राखून विजय

फ्लोरिडा, 03 ऑगस्ट : विडींजविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यात भारताने 4 गडी राखून विजय मिळवला. विंडीजने दिलेलं 96 धावांचं आव्हान भारताने 17.2 षटकांत 6 गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केलं. या सामन्यात गोलंदाजांचे वर्चस्व राहिले. विंडीजला प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 9 बाद 95 धावा करता आल्या होत्या. प्रत्युत्तरादाखल खेळताना भारतीय फलंदाजसुद्धा धडपडत होते.

भारताकडून रोहित शर्माने सर्वाधिक 25 धावा केल्या. तर विराट कोहली आणि मनिष पांडे यांनी प्रत्येकी 19 धावा केल्या. दुखापतीनंतर पुनरागमन करणाऱ्या धवनला एक धाव काढता आली. ऋषभ पंतला खातंही उघडता आलं नाही. शेवटी वॉशिंग्टन सुंदर आणि रविंद्र जडेजाने नाबाद राहत संघाला विजय मिळवून दिला. जडेजाने 10 तर सुंदरने नाबाद 8 धावा केल्या.

तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून भारताचा कर्णधार विराट कोहलीने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. विराटचा निर्णय सार्थ ठरवत गोलंदाजांनी भेदक मारा करत त्यांचा निम्मा संघ 33 धावांत तंबूत धाडला. विंडीजला 20 षटकांत 9 बाद 95 धावांपर्यंत मजल मारता आली. भारताकडून सैनीने 3 तर भुवनेश्वर कुमारनं 2 विकेट घेतल्या.त्यांच्याशिवाय खलील अहमद, वॉशिंग्टन सुंदर आणि रविंद्र जडेजा यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

विंडीजचा संघ गेल आणि रसेल या सलामीवीरांच्या अनुपस्थितीत खेळत आहे. या दोघांच्या संघात नसल्याचा त्यांना फटका बसला. भारताच्या वॉशिंग्टन सुंदरने दुसऱ्याच चेंडूवर विंडीजला पहिला दणका दिला. त्यानंतर भुवनेश्वर कुमारनं दुसऱ्या षटकात एविन लुईसला बाद केलं.

Loading...

पहिल्या दोन विकेट गमावल्यानंतर निकोलस पूरननं फटकेबाजी करण्याचा प्रयत्न केला. मात्र नवदीप सैनीच्या गोलंदाजीवर यष्टीरक्षक ऋषभ पंतकडे झेल देऊन तो बाद झाला. त्यानंतर शेम्रॉन हेटमायरचा त्रिफळ उडवून नवदीपने आणखी एक अडथळा दूर केला.रोव्हमन पॉवेलला खलील अहमदनं बाद केलं. त्यानंतर पोलार्डने एकाकी झुंज देत 49 धावांची खेळी करून डाव सावरला. त्याला इतर फलंदाजांची साथ मिळाली नाही. पोलार्ड नवदीप सैनीच्या चेंडूवर बाद झाला.

भावी मुख्यमंत्री सेनेचा? पाहा काय आहे आदित्य ठाकरेंच्या मनात

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 3, 2019 11:19 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...