ख्रिस गेलची इच्छा राहणार अधुरी, भारताविरुद्धचा सामना ठरणार अखेरचा

विंडीजचा तडाखेबाज फलंदाज ख्रिस गेल भारतविरुद्धच्या मालिकेनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होणार आहे.

News18 Lokmat | Updated On: Aug 10, 2019 10:26 AM IST

ख्रिस गेलची इच्छा राहणार अधुरी, भारताविरुद्धचा सामना ठरणार अखेरचा

वेस्ट इंडीजचा तडाखेबाज फलंदाज ख्रिस गेल लवकरच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणार आहे. वर्ल्ड कपनंतर त्यानं निवृत्ती घेण्याची घोषणा केली होती. मात्र, वर्ल्ड कपवेळीच त्यानं भारताविरुद्ध होणाऱ्या मालिकेनंतर निवृत्ती घेईन असं म्हटलं होतं.

भारताने वेस्ट इंडीज दौऱ्यातील टी20 मालिका 3-0 ने जिंकली, टी20 मालिकेत ख्रिस गेल खेळला नाही. त्यानंतर तो तीन एकदिवसीय सामन्यांसाठी संघात परतला आहे. मात्र, पहिल्या सामन्यात त्याची बॅट तळपली नाही. त्याच्या एकूण कारकिर्दीतील सर्वात संथ खेळी त्यानं केली. 4 धावांसाठी तब्बल 31 चेंडू खेळला. हा सामना पावसामुळं रद्द झाला तरी गेलच्या संथ खेळीची चर्चा सर्वत्र झाली.

ख्रिस गेल त्याच्या क्रिकेट कारकिर्दीतील अखेरचा सामना बुधवारी पोर्ट ऑफ स्पेनमध्ये खेळणार आहे. भारत-वेस्ट इंडीज यांच्यातील तीन सामन्यांच्या मालिकेतील अखेरचा सामना असणार आहे. हाच सामना गेलचा अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना ठरण्याची शक्यता आहे. गेलला भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी संघात स्थान मिळालं नाही.

वेस्ट इंडीजकडून 103 कसोटी सामने खेळलेल्या ख्रिस गेलनं अखेरचा सामना सप्टेंबर 2014 मध्ये खेळला होता. त्यानं वर्ल्ड कपवेळी सांगितलं होतं की, एक कसोटी आणि एकदिवसीय सामना खेळून आंतरराष्ट्रीय क्रिकेमधून निवृत्ती घेण्याची इच्छा आहे. मात्र, त्याची निवड कसोटी संघान न झाल्यानं ही इच्छा अपूर्ण राहणार आहे.

कसोटी कारकिर्दीत गेलनं 103 सामन्यांमध्ये 7 हजार 214 धावा केल्या आहेत. यात त्यानं सर्वाधिक 333 धावांची खेळी केली आहे. त्यात दुसरी कसोटी त्याच्या घरच्या मैदानावर होणार होती. यामध्ये गेलला संधी मिळाली असती तर त्याची निवृत्ती खास ठरली असती.

Loading...

वेस्ट इंडीजने वर्षाच्या सुरुवातील झालेल्या इंग्लंडविरुद्ध मालिकेसाठी निवडलेल्या संघातील खेळाडूंनाच संधी दिली आहे. त्यामधील अल्झारी जोसेफ आणि जोमेल वारिकान यांना दुखापतीमुळे खेळता येणार नाही. रहकिम कार्नवाल कसोटी संघातून पदार्पण करणार आहे.

विंडीजचा कसोटी संघ : जेसन होल्डर (कर्णधार), क्रेग ब्रेथवेट, ड्वेन ब्राव्हो, शमाराह ब्रूक्स, जॉन कॅपबेल, रोस्टन चेस, रहकीम कार्नवॉल, शेन डाउरिच, शेनन गॅब्रियल, शिम्रॉन हेटमायर, शाय होप, किमो पॉल, केमार रोच

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: cricket
First Published: Aug 10, 2019 10:13 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...