वनडेमध्ये गेल करणार अनोखं 'त्रिशतक', अशी कामगिरी करणारा विंडीजचा पहिलाच खेळाडू

विंडीजचा महान फलंदाज ब्रायन लाराचा एक विक्रम मोडण्यासाठी ख्रिस गेल वर्ल्ड कपपासून धडपडत आहे. गेल्या तीन सामन्यात त्याला अपयश आले असून आता एकाच वेळी दोन विक्रम नावावर करण्याची संधी आहे.

News18 Lokmat | Updated On: Aug 11, 2019 11:45 AM IST

वनडेमध्ये गेल करणार अनोखं 'त्रिशतक', अशी कामगिरी करणारा विंडीजचा पहिलाच खेळाडू

मुंबई, 11 ऑगस्ट : भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना रविवारी होणार आहे. पहिल्या सामन्यात 13 षटकांचा खेळ झाल्यानंतर पावसामुळे रद्द करण्यात आला होता. त्यात विंडीजचा फलंदाज ख्रिस गेलने चार धावांसाठी तब्बल 31 चेंडू घेतले होते. त्याच्या एकूण क्रिकेट कारकिर्दीतील ही सर्वात संथ खेळी ठरली. दुसऱ्या सामन्यात मात्र गेल विक्रमाच्या उंबरठ्यावर आहे. भारताविरुद्धच्या मालिकेनंतर गेल निवृत्ती घेणार आहे. भारताविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात गेलच्या नावावर नवा विक्रम नोंदवला जाणार आहे. गेलचा हा 300 वा एकदिवसीय सामना असेल. ख्रिस गेल अशी कामगिरी करणारा वेस्ट इंडीजचा क्रिकेटपटू ठरणार आहे.

ICC Cricket World Cup मध्ये वेस्ट इंडिजचा धडाकेबाज फलंदाज अफगाणिस्तानविरुद्ध फक्त 7 धावांवर बाद झाला होता. त्यानंतर भारताविरुद्धच्या सामन्यात त्याला फक्त 4 धावाच करता आल्या. वर्ल्ड कपच्या आधी गेलने सांगितलं होतं की, आपण स्पर्धेनंतर एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणार आहे. मात्र, पुन्हा भारताविरुद्धच्या मालिकेत खेळणार असल्याचं तो म्हटला होता. वर्ल्ड कपच्या अखेरच्या सामन्यापासून गेल लाराचा विक्रम मोडण्यासाठी धडपडत आहे.

वर्ल्ड कपमधील शेवटच्या सामन्यात 7 धावांवर बाद झालेला गेल वेस्ट इंडिजचा महान फलंदाज ब्रायन लाराच्या विक्रमापासून 11 धावा दूर राहिला होता. ब्रायन लाराच्या नावावर वेस्ट इंडिजकडून 295 सामन्यात 10 हजार 348 धावा करण्याचा विक्रम आहे. तर गेलने 265 सामन्यात 10 हजार 341 धावा केल्या आहेत. दोघांनीही प्रत्येकी चार सामने वर्ल्ड इलेव्हनसाठी खेळले असून यासह 299 सामन्यात लाराच्या 10 हजार 405 तर गेलच्या 299 सामन्यात 10 हजार 397 धावा झाल्या आहेत. या दोघांनीच वेस्ट इंडिजकडून खेळताना 10 हजार धावा पूर्ण केल्या आहेत.

ख्रिस गेलला दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज क्रिकेटपटू एबी डिव्हिलियर्सचा विक्रम मोडण्याची संधी आहे. गेल आणि डिव्हिलियर्सने एकदिवसीय क्रिकेटमध्ये समान 25 शतकं केली आहेत. अखेरच्या दोन सामन्यात त्यानं शतक केलं तर तो डिव्हिलियर्सला मागे टाकू शकतो.

बजरंगचं हंगामातील चौथं सुवर्ण तर विनेश फोगटची फायनलमध्ये धडक!

Loading...

पाकिस्तानला जाणं 'या' धोनीला पडलं महागात, झाली निलंबनाची कारवाई!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 11, 2019 11:45 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...