पंत ठरला फिनिशर, धोनीसारखा षटकार मारून जिंकला सामना

विंडीज विरुद्धच्या सामन्यात पंतने 42 चेंडूत नाबाद 65 धावांची वेगवान खेळी केली.

News18 Lokmat | Updated On: Aug 7, 2019 09:26 AM IST

पंत ठरला फिनिशर, धोनीसारखा षटकार मारून जिंकला सामना

विंडीजविरुद्ध पहिल्या दोन्ही सामन्यात लवकर बाद झालेल्या पंतने तिसऱ्या सामन्यात धमाकेदार खेळी केली. त्यानं 42 चेंडूत 65 धावांची मॅच विनिंग खेळी केली. विंडीजने दिलेलं 147 धावांचं आव्हान भारतानं 5 चेंडू आणि 7 गडी राखून जिंकलं.

भारताचे सलामीवीर शिखर धवन आणि केएल राहुल लवकर बाद झाल्यानंतर ऋषभ पंत आणि विराट कोहली यांनी डाव सावरला. दोघांनी महत्त्वपूर्ण अशी शतकी भागिदारी केली. विराट कोहलीने 59 धावा केल्या. 18 व्या षटकात कोहली बाद झाला.

कोहली बाद झाल्यानंतर ऋषभ पंतने मनीष पांडेसोबत विजयाची औपचारिकता पूर्ण केली. पंतने 37 चेंडूत त्याचं आंतरराष्ट्रीय टी 20 मधील पहिलं अर्धशतक साजरं केलं. 65 धावांच्या खेळीत त्यानं 4 चौकार आणि 4 षटकार मारले. भारताच्या यष्टीरक्षकाने केलेली  टी 20 मधील सर्वाधिक धावसंख्या आहे.

विराट कोहली आणि ऋषभ पंतने 106 धावांची भागिदारी केली. विराट कोहली 18 व्या षटकात बाद झाला. त्यानंतर पंतने 20 व्या षटकातील पहिल्या चेंडूवर षटकार मारून विजय मिळवून दिला. या विजयासह भारताने टी20 मालिका 3-0 ने जिंकली.

भारताने सलग दुसऱ्यांदा विंडीजविरुद्ध टी 20 मालिका 3-0 ने जिंकली. यापूर्वी भारताने ऑस्ट्रेलिया, श्रीलंकेविरुद्धही 3-0 ने विजय मिळवला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 7, 2019 08:36 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...