फक्त एक विकेट घेऊनही बुमराहनं रचला इतिहास, दिग्गजांना टाकलं मागे!

फक्त एक विकेट घेऊनही बुमराहनं रचला इतिहास, दिग्गजांना टाकलं मागे!

विंडीजविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात बुमराहनं फक्त एक विकेट घेतली. या विकेटसह त्यानं दिग्गजांना मागे टाकून इतिहास रचला.

  • Share this:

अँटिगुआ, 24 ऑगस्ट : विंडीजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताच्या गोलंजदाजांनी जबरदस्त कामगिरी केली. दुसऱ्या दिवशीचा खेळ संपला तेव्हा विंडीजची अवस्था 8 बाद 189 धावा अशी झाली होती. भारताचा वेगवान गोलंदाज इशांत शर्माने 5 विकेट घेत विंडीजच्या फलंदाजीला खिंडार पाडलं. त्याच्याशिवाय जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, रविंद्र जडेजा यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.

भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहनं ड्वेन ब्राव्होला बाद केलं. मात्र त्याने एक विकेट घेताच व्यंकटेश प्रसाद आणि मोहम्मद शमी यांचा विक्रम मोडला. ब्राव्होची विकेट ही बुमराहची कसोटीतील 50 वी विकेट ठरली.

जसप्रीत बुमराह 11 वी कसोटी खेळत असून त्यानं 50 वी विकेट घेत मोठी कामगिरी केली आहे. बुमराहनं भारताच्या वेगवान गोलंदाजांमध्ये सर्वात कमी वेळेत 50 विकेट घेण्याची कामगिरी केली. व्यंकटेश प्रसाद आणि मोहम्मद शमी यांनी 13 कसोटीत हा टप्पा गाठला होता.

भारताकडून सर्वात कमी सामन्यात 50 विकेट घेण्याचा विक्रम फिरकीपटू आर अश्विनच्या नावावर आहे. त्यानं फक्त 9 कसोटी सामन्यात ही कामगिरी केली होती. त्याच्यानंतर अनिल कुंबळे (दहा सामने) आणि नरेंद्र हिरवानी, हरभजन सिंग, बुमराह (11 सामने) यांचा नंबर लागतो.

अश्विनने जरी 9 सामन्यात ही कामगिरी केली असली तरी चेंडूंच्या बाबतीत मात्र बुमराहनं बाजी मारली आहे. बुमराहने 2 हजार 465 चेंडूत 50 विकेट घेतल्या आहेत तर अश्विनने 2 हजार 597 चेंडूत 50 विकेट घेतल्या होत्या.

VIDEO: मुख्यमंत्र्यांचा खासदार सुप्रिया सुळेंवर पलटवार; प्रश्नाला दिलं 'हे' उत्तर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 24, 2019 12:45 PM IST

ताज्या बातम्या