IND vs WI 1st Test : पुजारा-कोहली अपयशी, रहाणेनं भारताचा डाव सावरला

विंडीजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताचे आघाडीचे तीन फलंदाज दुहेरी धावसंख्याही गाठू शकले नाहीत.

News18 Lokmat | Updated On: Aug 23, 2019 07:07 AM IST

IND vs WI 1st Test : पुजारा-कोहली अपयशी, रहाणेनं भारताचा डाव सावरला

अँटिगुआ, 23 ऑगस्ट : विंडीजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात पहिल्या दिवशी सलामीवीर सपशेल अपयशी ठरले. त्यानंतर अजिंक्य रहाणेनं केलेल्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारतानं दिवसअखेर 6 बाद 203 धावांपर्यंत मजल मारली. नाणेफेक जिंकून विंडीजने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. कर्णधार जेसन होल्डरचा हा निर्णय सार्थ ठरवत विंडीजच्या गोलंदाजांनी भारताची 3 बाद 25 अशी अवस्था केली. मयंक अग्रवाल 5 धावा, चेतेश्वर पुजारा 2 धावा आणि विराट कोहली 9 धावांवर बाद झाले.

आघाडीची फळी लवकर बाद झाल्यानंतर लोकेश राहुल आणि अजिंक्य रहाणेनं डाव सावरला. मात्र, राहुल 44 धावांवर बाद झाला. त्यानंतर रहाणेनं हनुमा विराहीला साथीला घेत पडझड थांबवली. हनुमा विहारी 32 धावांवर बाद झाला. त्यानंतर लगेच अजिंक्य रहाणेसुद्धा बाद झाला. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा ऋषभ पंत 20 धावांवर तर रविंद्र जडेजा 3 धावांवर खेळत होते.

भारताचा सलामीवीर मयंक अग्रवाल केमार रोचच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. तेव्हा मैजानावरील पंचांनी त्याला नाबाद ठरवले होते. विंडीजचा कर्णधार जेसन होल्डरनं डीआरएसचा निर्णय घेतला. तिसऱ्या पंचांनी रिव्ह्यू पाहिला तेव्हा चेंडू बॅटला लागून गेल्याचं स्पष्ट दिसलं. मयंक अग्रवालला फक्त 5 धावाच काढता आल्या. त्यानंतर चेतेश्वर पुजारा आणि विराट कोहलीसुद्धा लवकर बाद झाले.

ईडी चौकशीत काय घडलं? राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांशी बोलताना EXCLUSIVE VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 23, 2019 07:07 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...