मुंबई, 22 जुलै: टीम इंडियाने दुसऱ्या वनडेमध्ये श्रीलंकेचा
(India vs Sri Lanka) 3 विकेटने पराभव केला आहे. या विजयासह भारताने 3 वनडे मॅचच्या सीरिजमध्ये 2-0ने विजयी आघाडी घेतली आहे. दीपक चहरच्या
(Deepak Chahar) अफलातून खेळीमुळे हा विजय शक्य झाला. श्रीलंकेने ठेवलेल्या 276 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची अवस्था 193/7 अशी झाली होती. तेव्हा हा सामना श्रीलंका जिंकेल असं वाटत होतं, चहरने श्रीलंकेच्या बॉलिंगवर आक्रमण केलं. त्याला भुवनेश्वर कुमारनं देखील साथ दिली.
चहरने त्यापूर्वी 53 रन देत 2 विकेट्स घेतल्या होत्या. श्रीलंकेविरुद्ध दुसऱ्या वन-डेमध्ये अष्टपैलू कामगिरी करत त्याने स्वत:ला सिद्ध केलं आहे. पण दीपक चहरचं क्रिकेट करिअर संपवण्याचा प्रयत्न टीम इंडियाचे माजी कोच ग्रेग चॅपेल
(Greg Chappell) यांनी केला होता. चॅपेल तेंव्बा राजस्थान क्रिकेट असोसिएशनमध्ये
(RCA) होते. चॅपेलनं चहरला उंचीचं कारण देत रिजेक्ट केलं होतं. तसंच क्रिकेट सोडून अन्य क्षेत्रात करिअर करण्याचा सल्ला दिला होता.
टीम इंडियाचा माजी फास्ट बॉलर व्यंकटेश प्रसादने
(Venkatesh Prasad) ट्विट करत हा खुलासा केला आहे. 'दीपक चहरला ग्रेग चॅपेलनं उंचीच कारण देत आरसीएमध्ये प्रवेश नाकारला होता. तसेच वेगळ्या क्षेत्रात करिअर करण्याचा सल्ला दिला. त्याने आज एकट्याच्या जीवावर मॅच जिंकून दिली. या गोष्टीचं सार्थ एकच आहे. स्वत:वर विश्वास ठेवा. विदेशी कोचला जास्त गांभीर्यानं घेऊ नका.
याला अपवाद आहेत. पण, भारतामध्ये प्रचंड प्रतिभा असताना आता टीम आणि फ्रँचायझींना भारतीय कोच आणि मेंटर यांना नियुक्त करण्याची वेळ आली आहे.' असे ट्विट प्रसादनं केलं आहे.
Suresh Raina Brahmin Controversy: सुरेश रैनाच्या ‘ब्राह्मण कार्ड’ला 'या' क्रिकेटपटूचा पाठिंबा!
भारत-श्रीलंका मालिकेतील तिसरी आणि शेवटची वन-डे शुक्रवारी होणार आहे. ही वन-डे देखील जिंकून श्रीलंकेला व्हाईटवॉश देण्याची संधी टीम इंडियाला आहे. शेवटच्या सामन्यात टीम इंडिया काही नवोदीत खेळाडूंना संधी देण्याची शक्यता आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.