मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs SL: 'हा तर वीरेंद्र सेहवाग', टीम इंडियातील खेळाडूबाबत मुरलीधरनचं मोठं वक्तव्य

IND vs SL: 'हा तर वीरेंद्र सेहवाग', टीम इंडियातील खेळाडूबाबत मुरलीधरनचं मोठं वक्तव्य

श्रीलंका दौऱ्यावरील एका खेळाडूबद्दल श्रीलंकेचा महान ऑफ स्पिनर मुथैय्या मुरलीधरन (Muttiah Muralitharan) याने मोठं वक्तव्य केलं आहे. मुरलीने त्याची तुलना टीम इंडियाचा माजी दिग्गज वीरेंद्र सेहवाग (Virendra Sehwag) बरोबर केली आहे.

  • Published by:  News18 Desk

कोलंबो, 18 जुलै: भारत विरुद्ध श्रीलंका (India vs Sri Lanka) यांच्यातील वन-डे मालिका सुरू होण्यासाठी आता काही तासांचाच कालावधी शिल्लक आहे. या मालिकेत काही तरुण खेळाडू टीम इंडियाकडून पदार्पण करणार आहेत. तर काही जणांना टीममधील जागा नक्की करण्याची चांगली संधी आहे. या दौऱ्यावरील एका खेळाडूबद्दल श्रीलंकेचा महान ऑफ स्पिनर मुथैय्या मुरलीधरन (Muttiah Muralitharan) याने मोठं वक्तव्य केलं आहे. मुरलीने त्याची तुलना टीम इंडियाचा माजी दिग्गज वीरेंद्र सेहवाग (Virendra Sehwag) बरोबर केली आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जास्त विकेट्स घेण्याचा रेकॉर्ड मुरलीधरनच्या नावावर आहे. मुरलीधरननं त्याच्या कारकिर्दीमध्ये सेहवागची बॅटींग जवळून पाहिली आहे. श्रीलंका दौऱ्यावर असलेल्या टीम इंडियामधील पृथ्वी शॉमध्ये (Prithvi Shaw) आपल्याला सेहवागची झलक दिसते, असे मुरलीधरनने ‘इएसपीएन क्रिकइन्फो’ या वेबसाईटशी बोलताना स्पष्ट केले.

‘पृथ्वी शॉ टेस्टपेक्षा वन-डे आणि टी20 क्रिकेटमधील चांगला बॅट्समन आहे. त्याचा खेळ पाहून मला वीरेंद्र सेहवाग आठवतो. तो देखील नेहमी धोका पत्कारतो आणि बॉलर्सना दबावात टाकतो. पृथ्वीमध्ये वेगाने बॅटींग करण्याची आणि मोठी इनिंग खेळण्याची क्षमता आहे. त्यामुळे तो चांगलं खेळला तर टीम इंडियाच्या विजयाची शक्यता जास्त असेल. तो अगदी कमी वेळेत जास्त रन करतो. त्याच्याकडे गुणवत्ता आहे. तो निर्भिड असून त्याला आऊट होण्याची भीती वाटत नाही,’ असे मुरलीधरननं सांगितलं.

'नाम है मेरा...', वीरेंद्र सेहवागनं दिग्गज क्रिकेटपटूला दिल्या 'गुंडा स्टाईल' शुभेच्छा!

‘श्रीलंका विरुद्धच्या मालिकेत पृथ्वी शॉला नैसर्गिक खेळ खेळण्याचं टीम इंडियानं स्वातंत्र्य द्यावं. तर त्याचा पार्टनर शिखर धवननं सामान्य बॅटींग करावी,’ असा सल्ला देखील मुरलीधरननं टीम इंडियाला दिला आहे.

First published:

Tags: Cricket news, India Vs Sri lanka, Prithvi Shaw, Virender sehwag