• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • IND vs SL: टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यासाठी सज्ज, पहिल्या मॅचपूर्वी कॅप्टन धवनसाठी Good News

IND vs SL: टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यासाठी सज्ज, पहिल्या मॅचपूर्वी कॅप्टन धवनसाठी Good News

अनुभवी बॅट्समन शिखर धवन (Shikhar Dhawan) या दौऱ्यात टीमचा कॅप्टन आहे. श्रीलंका दौऱ्यातील पहिली मॅच सुरु होण्यापूर्वी शिखर धवनसाठी एक आनंदाची बातमी आहे.

 • Share this:
  मुंबई, 28 जून: टीम इंडिया तीन टी20 आणि तीन वन-डे सामन्यांच्या मालिकेसाठी सज्ज झाली आहे. विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखाली (Virat Kohli) सर्व प्रमुख खेळाडू सध्या इंग्लंडमध्ये आहेत. त्यामुळे 13 जुलैपासून सुरु होणाऱ्या या दौऱ्यात अनेक नव्या दमाच्या खेळाडूंना निवड समितीनं संधी दिली आहे. अनुभवी बॅट्समन शिखर धवन (Shikhar Dhawan) या दौऱ्यासाठी टीमचा कॅप्टन आहे. धवन पहिल्यांदाच भारतीय क्रिकेट टीमचं नेतृत्त्व करतोय. तर माजी कॅप्टन आणि दिग्गज क्रिकेटपटू राहुल द्रविड (Rahul Dravid) मुख्य प्रशिक्षक आहे. धवनसाठी आनंदाची बातमी  श्रीलंका दौऱ्यातील पहिली मॅच सुरु होण्यापूर्वी शिखर धवनसाठी एक आनंदाची बातमी आहे. टीम इंडियाचा टी20 क्रिकेटमधील श्रीलंकेतील रेकॉर्ड हा यजमान देशापेक्षा चांगला आहे. दोन्ही देशांनी आजवर श्रीलंकेत 13 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले आहेत. त्यापैकी 11 सामने टीम इंडियाने जिंकले आहेत. तर फक्त 2 सामन्यात पराभव झाला आहे. श्रीलंकेनं त्यांच्या देशात आजवर 42 टी20 सामने खेळले असून त्यामध्ये 15 मध्ये विजय तर 25 सामन्यात त्यांचा पराभव झाला आहे. श्रीलंकेचा भारताविरुद्धच्या विजयाचा रेकॉर्ड 15 टक्के तर एकूण रेकॉर्ड 36 टक्के आहे. त्यामुळे टीम इंडियानं त्यांच्या क्षमतेनुसार खेळ केला तर ही मालिका जिंकण्यास काहीही अडचण येणार नाही. मागील पाच मालिकेत पराभव श्रीलंकेची टीम मागील पाच टी20 मध्ये पराभूत झाली आहे. यापैकी 4 मालिकांमध्ये त्यांना एकही विजय मिळवता आलेला नाही. ऑस्ट्रेलियानं सर्वप्रथम त्यांना 3-0 ने पराभूत केले होते. त्यानंतर भारताने 2-0, वेस्ट इंडिज विरुद्ध 2-0 आणि 2-1 आणि आता नुकताच इंग्लंडनं  त्यांचा 3-0  असा एकतर्फी पराभव केला आहे. श्रीलंकेची कामगिरी क्रिकेटच्या सर्वच प्रकारत खालावली आहे. क्रिकेट बोर्ड आणि खेळाडूंचा वेतनाबाबत वाद सुरू आहे. वरिष्ठ खेळाडूंनी टीमच्या कामगिरीवर जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. क्रिकेट मालिकेत पुन्हा कोरोनाचा शिरकाव! एकाला लागण, 7 जणांना धोका श्रीलंका दौऱ्यासाठी टीम इंडिया : शिखर धवन (कॅप्टन), भुवनेश्वर कुमार (व्हाईस कॅप्टन), पृथ्वी शॉ, देवदत्त पडिक्कल, ऋतुराज गायकवाड, सूर्यकुमार यादव, मनिष पांडे, हार्दिक पांड्या, नितिश राणा, इशान किशन, संजू सॅमसन, युजवेंद्र चहल, राहुल चहर, कृष्णप्पा गौतम, कृणाल पांड्या, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, दीपक चहर, नवदीप सैनी आणि चेतन सकारिया नेट बॉलर्स : इशान पोरेल, संदीप वॉरियर, अर्शदीप सिंह, साई किशोर आणि समरजीत सिंह
  Published by:News18 Desk
  First published: