मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2022 : आयपीएल स्पर्धेच्या महिनाभर आधी मुंबई इंडियन्सला धक्का, प्रमुख खेळाडूनं वाढवलं रोहितचं टेन्शन

IPL 2022 : आयपीएल स्पर्धेच्या महिनाभर आधी मुंबई इंडियन्सला धक्का, प्रमुख खेळाडूनं वाढवलं रोहितचं टेन्शन

आयपीएल स्पर्धेचा 15 वा सिझन (IPL 2022) आता महिनाभरावर आला आहे. या स्पर्धेच्या तोंडावर मुंबई इंडियन्सला (Mumbai Indians) मोठा धक्का बसला आहे.

  • Published by:  News18 Desk

मुंबई. 23 फेब्रुवारी : आयपीएल स्पर्धेचा 15 वा सिझन (IPL 2022) आता महिनाभरावर आला आहे. या स्पर्धेच्या तोंडावर मुंबई इंडियन्सला (Mumbai Indians) मोठा धक्का बसला आहे. मुंबई इंडियन्स आणि टीम इंडियाचा प्रमुख खेळाडू सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) श्रीलंका सीरिजमधून आऊट झाला आहे. सूर्यकुमार हेअरलाईन फॅक्चरममुळे आगामी सीरिज खेळणार नाही. बीसीसीआयनं ही घोषणा केली आहे.

31 वर्षांच्या सूर्यकुमारसाठी ही सीरिज यशस्वी ठरली. त्याला श्रेयस अय्यर आणि दीपक हुडाच्या ऐवजी पसंती देण्यात आली होतू. सूर्यानं या संधीचीा संपूर्ण फायदा घेतला. त्याने या सीरिजमध्ये टीम इंडियाकडून सर्वात जास्त रन केले. त्याला रविवारच्या खेळाबद्धल 'प्लेयर ऑफ द मॅच' तसेच संपूर्ण सीरिजमध्ये सातत्यपूर्ण खेळ केल्याबद्दल 'प्लेयर ऑफ द सीरिज' हा पुरस्कार देण्यात आला.

सूर्यकुमार यादवला तिसऱ्या टी20 सामन्याच्या दरम्यान हेअरलाईन फ्रॅक्चर झाले आहे. त्यामुळे तो श्रीलंका सीरिज खेळणार नसल्याचं बीसीसीआयनं स्पष्ट केले आहे. त्याची दुखापत किती गंभीर आहे हे अद्याप समजलेलं नाही.  सूर्याला मुंबई इंडियन्सनं रिटेन केले आहे. त्याची दुखापत गंभीर असल्यास टीमला आयपीएलमध्ये फटका बसू शकतो.

सूर्यकुमार यादवप्रमाणेच दीपक चहरही दुखापतीमुळे श्रीलंका विरूद्धची टी20 सीरिज खेळणार नाही. चहरनं रविवारी झालेल्या सामन्यात फक्त 1.5 ओव्हर्स बॉलिंग केली होती. त्यानंतर स्नायू दुखावल्यामुळे त्याने मैदान सोडले होते.

टी20 सीरिजसाठी टीम इंडिया

रोहित शर्मा (कॅप्टन), इशान किशन, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन, व्यंकटेश अय्यर, दीपक हुड्डा, रविंद्र जडेजा, युजवेंद्र चहल, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, हर्षल पटेल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार आणि आवेश खान

First published:

Tags: Ipl 2022, Mumbai Indians, Rohit sharma, Suryakumar yadav