Home /News /sport /

IND vs ENG: टीम इंडियाविरुद्ध श्रीलंकेचा नवा 'डाव', द्रविडला बदलावा लागेल 'प्लॅन'

IND vs ENG: टीम इंडियाविरुद्ध श्रीलंकेचा नवा 'डाव', द्रविडला बदलावा लागेल 'प्लॅन'

टीम इंडिया 3 वन-डे आणि 3 टी 20 सामन्यांच्या India vs Sri Lanka) मालिकेसाठी श्रीलंकेत दाखल झाली आहे. नव्या दमाची टीम इंडिया या दौऱ्यासाठी सज्ज होत असतानाच यजमान श्रीलंका क्रिकेट बोर्ड अडचणीत आहे.

    मुंबई, 4 जुलै: टीम इंडिया (Team India) 3 वन-डे आणि 3 टी 20 सामन्यांच्या (India vs Sri Lanka) मालिकेसाठी श्रीलंकेत दाखल झाली आहे. क्वारंटाईन कालावधी संपल्यानंतर भारतीय क्रिकेट टीमनं अभ्यास देखील सुरु केला आहे. नव्या दमाची टीम इंडिया या दौऱ्यासाठी सज्ज होत असतानाच यजमान श्रीलंका क्रिकेट बोर्ड अडचणीत आहे. श्रीलंकेच्या खेळाडूंनी अद्यापही वार्षिक करारावर स्वाक्षरी केलेली नाही. त्यामुळे बोर्डासमोर टीम निवडीची गंभीर समस्या आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, श्रीलंकेची टीम 5 जुलै रोजी इंग्लंडहून मायदेशी परतणार आहे. मायदेशी परतल्यानंतर या खेळाडूंनी करारावर स्वाक्षरी केली नाही तर निवड समिती नव्या खेळाडूंना या मालिकेसाठी संधी देण्याच्या विचारात आहे. निवड समितीचे अध्यक्ष प्रमोदया विक्रमसिंघे यांनी याबाबतचे स्पष्ट संकेत दिले आहेत. भारताविरुद्धच्या मालिकेपूर्वी खेळाडूंनी करारावर स्वाक्षरी केली नाही तर आम्ही प्रमुख 39 खेळाडूंच्या शिवाय नव्या खेळाडूंची निवड करु शकतो, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. पाच खेळाडूंनी सोडला कॅम्प इंग्लंड दौऱ्यावर न गेलेले खेळाडू सध्या दोन वेगवेगळ्या ठिकाणी सराव करत आहेत. या सराव शिबिरातील पाच खेळाडूंनी यापूर्वीच करारावर स्वाक्षरी करण्यास नकार दिला आहे. लाहिरु कुमारा, कशून रजिता. विश्वा फर्नांडो, अशेन बंडारा आणि लसिथ एबुलडेनिया या पाच जणांनी करार करण्यास नकार दिला. इतकंच नाही तर,  हे सर्व टीमचा कॅम्प सोडून निघून गेले आहेत. 'हा खेळाडूंचा अपमान', टीम मॅनेजमेंटच्या 'त्या' विचारावर कपिल देव नाराज राहुल द्रविड काय करणार? श्रीलंका दौऱ्यावर जाण्यापूर्वी टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडनं (Rahul Dravid) मॅनेजमेंटची भूमिका स्पष्ट केली होती. सर्व खेळाडूंना अंतिम 11 मध्ये संधी देणे शक्य नाही, हे द्रविडने सांगितले होते. आता श्रीलंकेनं दुय्यम खेळाडूंची निवड केली तर द्रविड त्याचा प्लॅन बदलण्याची शक्यता आहे. त्या परिस्थितीमध्ये जास्तीत जास्त नव्या खेळाडूंना टीम इंडियाकडून खेळण्याची संधी मिळेल.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: India Vs Sri lanka, Rahul dravid

    पुढील बातम्या