• Home
  • »
  • News
  • »
  • sport
  • »
  • IND vs SL : वन-डे मालिकेपूर्वी श्रीलंकन टीमबद्दल मोठं अपडेट

IND vs SL : वन-डे मालिकेपूर्वी श्रीलंकन टीमबद्दल मोठं अपडेट

भारत विरुद्ध श्रीलंका (India vs Sri Lanka) यांच्यातील वन-डे मालिका 13 जुलैपासून सुरू होणार आहे. या मालिकेपूर्वी एक मोठी अपडेट आहे.

  • Share this:
    मुंबई, 9 जुलै : भारत विरुद्ध श्रीलंका (India vs Sri Lanka) यांच्यातील वन-डे मालिका 13 जुलैपासून सुरू होणार आहे. या मालिकेपूर्वी एक चांगली बातमी आली आहे. श्रीलंका टीमच्या सर्व खेळाडूंचे कोरोना (Covid-19) रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत. टीमचे बॅटींग कोच ग्रँट फ्लॉवर (Grant Flower) यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर श्रीलंका बोर्डाची काळजी वाढली होती. आता या मालिकेला कोणताही धोका नाही. श्रीलंकेची टीम 5 जुलै रोजी इंग्लंड दौऱ्यावरुन परतली आहे. त्यांना नियमानुसार 7 दिवस क्वारंटाईन राहणे आवश्यक आहे. टीमचा क्वारंटाईन कालावधी 12 एप्रिल रोजी संपेल. त्यामुळे श्रीलंकन टीम कोणत्याही प्रॅक्टीसशिवाय वन-डे मालिकेत उतरणार आहे. श्रीलंकेच्या खेळाडूंना पहिले 3 दिवस हॉटेलमधील रुमच्या बाहेर जाण्याची परवानगी नाही. त्यानंतर पुढील चार दिवस खेळाडू जिम आणि स्विमिंग पूलचा वापर करु शकतील. भारताविरुद्ध नवा कॅप्टन भारताविरुद्धच्या वन-डे मालिकेसाठी श्रीलंकेनं अद्याप कॅप्टनची घोषणा केलेली नाही. खेळाडू आणि बोर्डात नव्या करारावरुन सुरु असलेल्या वादामुळे ही निवड झालेली नाही. मात्र लंकेचा कॅप्टन कुशल परेराची (Kusal Perera) हकालपट्टी निश्चित आहे. माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार ऑल राऊंडर दासून शनाकाला (Dasun Shanaka) या सीरिजसाठी कॅप्टन करण्याचा निर्णय श्रीलंका क्रिकेट बोर्डानं घेतला आहे. शनाका हा नव्या करारपद्धतीवर स्वाक्षरी करणारा पहिला खेळाडू होता. 29 वर्षाचा शनाका आक्रमक बॅट्समन आणि फास्ट बॉलर आहे. तो गेल्या चार वर्षातील श्रीलंकेचा सहावा कॅप्टन असेल. यापूर्वी दिनेश चंदिमल, अँजलो मॅथ्यूज, लसिथ मलिंगा, दिमूथ करुणारत्ने आणि कुशल परेरा यांनी श्रीलंकेचं नेतृत्तव केलं आहे. शनाकाने यापूर्वी 2019 साली पाकिस्तान विरुद्ध झालेल्या 3 टी20 मॅचमध्ये कॅप्टनसी सांभाळली होती. ती मालिका श्रीलंकेनं 3-0 अशी जिंकली होती. T20 World Cup 2021: 'विराट-रोहित ओपनिंग करणार तर 'हा' 3 नंबरसाठी आदर्श बॅट्समन' शनाकानं श्रीलंकेकडून आजवर 6 टेस्ट, 28 वन-डे आणि 43 टी20 सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने टेस्टमध्ये 140, वन-डेमध्ये 611 तर टी20 मध्ये 543 रन काढले आहेत. त्याने या तीन्ही प्रकारात मिळून 34 विकेट्स घेतल्या आहेत.
    Published by:News18 Desk
    First published: