मुंबई, 22 जुलै : भारताविरुद्ध झालेल्या दुसऱ्या वन-डेमध्ये (India vs Sri Lanka) 276 रनचं संरक्षण करण्यात श्रीलंकेला अपयश आलं. भारताच्या दीपक चहर (Deepak Chahar) आणि भुवनेश्वर कुमार (Bhubneshwar Kumar) या प्रमुख बॉलर्सच्या जोडीनं बॅटींग करत श्रीलंकेला पराभूत केलं. या पराभवामुळे श्रीलंकेनं भारताविरुद्धची वन-डे मालिका देखील गमावली.श्रीलंका टीमच्या सध्याच्या कामगिरीवर महान स्पिनर मुथैय्या मुरलीधरन (Muttiah Muralitharan) निराश झाला आहे. ही टीम मॅच जिंकणेच विसरली आहे. देशाच्या खेळाची सध्या बिकट अवस्था आहे, असं मत त्याने व्यक्त केलं आहे. त्याचबरोबर दासून शनाकाच्या टीमनं मॅच कुठे गमावली हे देखील सांगितले आहे.
मुरलीधरन ‘क्रिकइन्फो’शी बोलताना म्हणाला की, ‘श्रीलंकेची टीम गेल्या काही वर्षात कसं जिकांयचं हेच विसरली आहे. चुरशीच्या प्रसंगात काय करावं हेच त्यांना माहिती नाही. लेग स्पिनर वानिंदू हसरंगानं तीन विकेट्स घेतल्या होत्या. भारताची अवस्था 7 आऊट 193 अशी असताना शनाकानं त्याचे ओव्हर्स शिल्लक ठेवले. ही त्याची मोठी चूक होती.
श्रीलंकेनं पहिल्या 10-15 ओव्हरमध्ये तीन विकेट्स घेतल्या तर भारताला संघर्ष करावा लागेल, हे मी यापूर्वीच सांगितले होते. भूवनेश्वर कुमार आणि दीपक चहरनं जोरदार खेळ करत विजय खेचून आणला. श्रीलंकेच्या कॅप्टननं त्यांची विकेट घेण्याचा प्रयत्न करायला हवा होता.
टीम इंडियामधील मुंबई इंडियन्स, 'या' 14 जणांची टीम आहे जगात भारी!
भुवनेश्वर किंवा दीपक चहरपैकी एकाची जरी विकेट मिळाली असती तर नंतरच्या बॅट्समननं आठ ते नऊ रनच्या सरासरीनं रन काढणे अवघड झाले असते. मिकी ऑर्थर शेवटच्या काही ओव्हर्समध्ये निराश दिसले. त्यावर कोचनं संयम सोडता कामा नये, त्यांनी योग्य निरोप नव्या कॅप्टनला द्यायला हवा होता,’ असे मुरलीधरनने स्पष्ट केले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket news, India Vs Sri lanka