मुंबई, 31 जुलै : भारत विरुद्ध श्रीलंका
(India vs Sri Lanka) यांच्यात नुकतीच झालेली टी20 मालिका श्रीलंकेच्या टीमनं जिंकली. श्रीलंकेनं पहिल्यांदाच भारताविरुद्ध टी20 मालिका जिंकण्याचा विक्रम केला आहे. या ऐतिहासिक कामगिरीवर श्रीलंका क्रिकेट बोर्ड
(SLC) खूश झालं असून त्यांनी या मालिकेतील क्रिकेटपटूंना मालामाल करण्याचा निर्णय केला आहे.
श्रीलंका क्रिकेट बोर्डानं त्यांच्या राष्ट्रीय टीमला 100,000 डॉलर (जवळपास 74 लाख) रुपये देण्याची घोषणा केली आहे. वन-डे मालिकेत श्रीलंकेचा पराभव झाला. त्यानंतर पहिला टी20 सामना गमावल्यानंतर यजमान टीमनं पुढील सलग दोन सामने जिंकत मालिरा जिंकली. तिसऱ्या आणि शेवटच्या टी 20 सामन्यात श्रीलंकेनं भारताचा 7 विकेट्सनं पराभव केला.
श्रीलंका क्रिकेट बोर्डानं याबाबत एक पत्रक प्रसिद्ध केलं आहे. त्यामध्ये, श्रीलंका क्रिकेटच्या कार्यकारी समितीनं खेळाडू, कोच आणि सहयोगी स्टाफचं या अत्यंत आवश्यक विजयासाठी अभिनंदन केलं असून राष्ट्रीय टीमला 100,000 डॉलरचं बक्षीस देण्याची घोषणा केली आहे.
टी20 मालिकेच्या दरम्यान कृणाल पांड्याला
(Krunal Pandya) कोरोना झाल्यानं भारताचे 9 प्रमुख खेळाडू शेवटच्या दोन सामन्यातून आऊट झाले. त्याचा मोठा फटका टीम इंडियाला या मालिकेत बसला. श्रीलंकेनं 2019 नंतर पहिल्यांदाच एखादी द्विपक्षीय मालिका जिंकली आहे. तर भारतानं सहा टी20 सीरिज जिंकल्यानंतर एखादी मालिका गमावली आहे.
भारताचा संपूर्ण श्रीलंका दौराच कोरोनामुळे प्रभावित झाला. वन-डे मालिका सुरू होण्यापूर्वी श्रीलंकेच्या कोचिंग स्टाफमधील सदस्याला कोरोना झाला. त्यामुळे ही मालिका पुढे ढकलावी लागली. मालिका संपल्यानंतर युजवेंद्र चहल आणि के. गौतम या टीम इंडियाच्या आणखी दोन खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याचं उघड झालं.
वीरेंद्र सेहवागला आठवले 'अच्छे दिन' Photo शेअर करत म्हणाला...
राहुल द्रविड निराश नाही
टी 20 मालिकेत श्रीलंकेकडून पराभूत झाल्यानंतरही टीम इंडियाचा या दौऱ्यावरील कोच राहुल द्रविड
(Rahul Dravid) निराश नाही. मी अजिबात निराश नाही, कारण सगळे खेळाडू तरुण आहेत. ते अनुभवातून शिकतील. या प्रकारची परिस्थिती आणि बॉलर्सचा सामना करून त्यांना शिकता येईल. श्रीलंकेच्या टीमची बॉलिंग खूप चांगली आहे,' असं द्रविडनं या पराभवानंतर स्पष्ट केलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.