IND vs SL : 27 शतक काढूनही निवड समितीकडून उपेक्षा, बॅट्समननं सोशल मीडियावर व्यक्त केली निराशा

IND vs SL : 27 शतक काढूनही निवड समितीकडून उपेक्षा, बॅट्समननं सोशल मीडियावर व्यक्त केली निराशा

श्रीलंका दौऱ्यावर जाणाऱ्या टीम इंडियाची (Team India) घोषणा करण्यात आली आहे. या टीममध्ये 27 शतक झळकावणाऱ्या बॅट्समनकडं निवड समितीने दुर्लक्ष केले आहे.

  • Share this:

मुंबई, 11 जून : श्रीलंका दौऱ्यार जाणाऱ्या टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. या दौऱ्यासाठी शिखर धवन (Shikhar Dhwan) कॅप्टन तर भुवनेश्वर कुमार व्हाईस कॅप्टन आहे. टीममध्ये 6 नव्या खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. विराट कोहलीच्या (Virat Kohli) नेतृत्वाखालील  टीम इंडिया सध्या इंग्लंडच्या दौऱ्यावर आहे.

न्यूझीलंडविरुद्धची वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल (World Test Championship Final) झाल्यानंतर टीम इंडिया इंग्लंडमध्येच राहिल. 18 जून ते 22 जून या काळात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल होईल, यानंतर भारतीय खेळाडू इंग्लंडविरुद्धची 5 टेस्ट मॅचची सीरिज खेळतील. 4 ऑगस्टपासून या सीरिजला सुरुवात होणार आहे. कोरोनाचं संकट आणि क्वारंटाईनचे नियम यामुळे भारतीय टीम न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यानंतरही इंग्लंडमध्येच थांबणार आहे.

भारतीय टीम इंग्लंडमध्ये असतानाच जुलै महिन्यात भारत आणि श्रीलंका यांच्यात वनडे आणि टी-20 सीरिज होणार आहे. या सीरिजसाठी पूर्णपणे वेगळ्या टीमची निवड करण्यात आली आहे. हा दौरा म्हणजे नवोदीत खेळाडूंना स्वत:ला सिद्ध करण्याची चांगली संधी आहे. या टीममध्ये निवड न झाल्याने सौराष्ट्राचा माजी बॅट्समन शेल्डन जॅक्सन (Sheldon Jackson) निराश झाला आहे. त्याने ट्विटरवर त्याची नाराजी व्यक्त केली आहे. त्यावर टीम इंडियाचा माजी खेळाडू रोहन गावसकर (Rohan Gavaskar) याने जॅक्सनला निराश न होता आगामी संधीसाठी तयार राहण्याचा सल्ला दिला आहे.

दोन सिझनमध्ये 800 रन

जॅक्सननं मागील दोन रणजी सिझनमध्ये 800 पेक्षा जास्त रन काढले होते. प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीमध्ये श्रीलंका दौऱ्यावर निवड होण्याची त्याला आशा होती, पण तसे न झाल्याने तो निराश झाला आहे.

सचिन-द्रविडसारख्या दिग्गजांची घेतली होती विकेट, सेक्स टेपमुळे झाला बदनाम

जॅक्सनच्या नावावर देशांतर्गत क्रिकेटमधील सर्व प्रकारात मिळून एकूण 27 शतक आहेत. यापैकी फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये त्याने 76 मॅचमध्ये 19 शतक आणि 27 अर्धशतकासह 5 हजार 634 रन केले आहेत. तर 60 A श्रेणीच्या मॅचमध्ये 7 शतक आणि 11 अर्धशतकासह 2096 रन काढले आहेत. जॅक्सनने 59 टी 20 मॅचमध्ये 1 शतक आणि 6 अर्धशतकासह एकूण 1240 रन काढले आहेत.

Published by: News18 Desk
First published: June 11, 2021, 12:22 PM IST

ताज्या बातम्या