• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • IND vs SL: पृथ्वी शॉच्या खेळीवर कथित गर्लफ्रेंड खूश, आनंदामध्ये दिली 'ही' प्रतिक्रिया

IND vs SL: पृथ्वी शॉच्या खेळीवर कथित गर्लफ्रेंड खूश, आनंदामध्ये दिली 'ही' प्रतिक्रिया

श्रीलंका दौऱ्यातील टीम इंडियाच्या पहिल्या विजयाचा पाया पृथ्वी शॉने (Prithvi Shaw) रचला. पृथ्वीने 24 बॉलमध्ये 9 फोरच्या मदतीनं 43 रन काढले. पृथ्वीच्या खेळीवर त्याची कथित गर्लफ्रेंड (Rumored Girlfriend) भलतीच खूश झाली आहे.

 • Share this:
  कोलंबो, 19 जुलै: श्रीलंका दौऱ्यातील टीम इंडियाच्या पहिल्या विजयाचा पाया पृथ्वी शॉने (Prithvi Shaw) रचला. पृथ्वीने  24 बॉलमध्ये 9 फोरच्या मदतीनं 43 रन काढले. पृथ्वीनं पहिल्या 5.3 ओव्हरमध्येच मॅचचं चित्र स्पष्ट केले होते.  त्याने आक्रमक सुरूवात करुन दिल्यानं टीम इंडियानं 263 रनचं आव्हान 36.4 ओव्हरमध्येच पूर्ण केले. या खेळीसाठी त्याला 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार देखील देण्यात आला. त्याच्या आक्रमक बॅटींगनं क्रिकेटमधील अनेक दिग्गज प्रभावित झाले आहेत. पृथ्वी शॉच्या या धमाकेदार खेळीमुळे त्याची कथित गर्लफ्रेंड (Rumored Girlfriend) प्राची सिंह (Prachi Singh) देखील खूश झाली आहे. तिने इन्स्टाग्रामवर दोन पोस्ट टाकत हा आनंद साजरा केला. प्राचीनं पहिल्या पोस्टमध्ये म्हंटलं की,' पृथ्वी चांगला खेळलास. 24 बॉल मध्ये 43 रन. यामध्ये 9 फोरचा समावेश 36 रन बाउंड्रीमुळे आले. टीम इंडियाला जबरदस्त सुरुवात करुन दिलीस.' तर दुसऱ्या पोस्टमध्ये प्राचीनं, 'प्लेयर ऑफ द मॅच पुरस्काराचा योग्य मानकरी' असं पृथ्वीचं वर्णन केलं आहे. IND vs SL : मुंबई इंडियन्सच्या खेळाडूनं सांगितलं ऐतिहासिक सिक्सचं रहस्य! कोण आहे प्राची सिंह? प्राची सिंह ही नवोदीत अभिनेत्री आहे. तिनं कलर्स टीव्हीवरील उडान या मालिकेत काम केलं आहे. प्राची मॉडल असून उत्तम डान्सर देखील आहे. क्रिकेटर पृथ्वी शॉ आणि अभिनेत्री प्राची सिंहच्या अफेअरबद्दल सोशल मीडियावर चर्चा सुरू असते. हे दोघंही आतापर्यंत एकत्र दिसले नाहीत,  मात्र, सोशल मीडियावर प्राची पृथ्वीचे फोटो टाकत असते. 2020च्या आयपीएल स्पर्धेपासून या दोघांच्या नात्याबद्दल चर्चा होत आहे. दोघंही इन्स्टाग्रामवर एकमेकांच्या फोटोवर कमेंट्स करत असतात. या वर्षीच्या आयपीएल (IPL 2021) स्पर्धेदरम्यान जेव्हा जेव्हा पृथ्वी शॉ चांगलं खेळत होता, तेव्हा प्राची त्याचं कौतुक करणाऱ्या आणि त्याला चिअर करणाऱ्या पोस्ट इन्स्टा स्टोरीमध्ये शेअर करत होती. बॉलिवूड आणि क्रिकेटचं नातं जुनं आहे. यापूर्वी देखील अनेक क्रिकेटपटूंनी अभिनेत्रींशी लग्न केलं आहे. या  परंपरेत पृथ्वी शॉचा देखील समावेश होणार का? अशी चर्चा गेल्या अनेक दिवसांपून सुरु आहे.
  Published by:News18 Desk
  First published: