मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs SL: कुलदीप-चहलची धमाल, टीम इंडियाच्या दिग्गजांची केली नक्कल! पाहा VIDEO

IND vs SL: कुलदीप-चहलची धमाल, टीम इंडियाच्या दिग्गजांची केली नक्कल! पाहा VIDEO

शिखर धवनच्या (Shikhar Dhawan) नेतृत्त्वाखालील टीम इंडिया आगामी मालिकेची तयारी करत आहे. श्रीलंका दौऱ्यातील भारतीय खेळाडू सराव झाल्यानंतर उरलेल्या वेळात एकमेकांच्या सोबत धमाल करत आहेत.

  • Published by:  News18 Desk
मुंबई, 15 जुलै: इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या टीम इंडियामध्ये सध्या काळजीचं वातावरण आहे. या दौऱ्यातील प्रमुख खेळाडू ऋषभ पंतला (Rishabh Pant) कोरोनाची लागण झाली आहे. त्याचवेळी इंग्लंडपासून दूर श्रीलंकेतही सध्या शिखर धवनच्या (Shikhar Dhawan) नेतृत्त्वाखालील टीम इंडिया आगामी मालिकेची तयारी करत आहे. भारत विरुद्ध श्रीलंका (India vs Sri Lanka) यांच्यातील मालिका 18 जुलैपासून सुरू होत आहे. श्रीलंका दौऱ्यातील भारतीय खेळाडू सराव झाल्यानंतर उरलेल्या वेळात एकमेकांच्या सोबत धमाल करत आहेत. या दौऱ्यात 'कुलचा' नावाने प्रसिद्ध असलेली कुलदीप यादव (Kuldeep Yadav) आणि युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) ही जोडी एकत्र आहे. मैदानात एकत्र खेळताना प्रतिस्पर्धी टीमची दाणदाण उडवणारी हे दोघं मैदानाबाहेरही चांगले मित्र आहेत. भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डानं (BCCI) एक व्हिडीओ नुकताच त्यांच्या ट्विटर हँडलवरुन शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये हे दोघं कार्ड गेम खेळत आपला रिकामा वेळ घालवताना दिसत आहेत. चहल वेगगळ्या खेळाडूंचं नाव असलेलं कार्ड त्याच्या डोक्यावर धरतो. त्यामधील नाव वाचून कुलदीप त्या खेळाडूंची नक्कल करत चहलला हिंट देतो. कुलदीपचा तो अभिनय पाहून चहल त्या खेळाडूंची नावं ओळखतो. इशांत शर्मा, विराट कोहली, ऋषभ पंत आणि महेंद्रसिंह धोनी या टीम इंडियाच्या चार खेळाडूंच्या मैदानातील हावाभावाची नक्कल कुलदीपनं तोंड न उघडता अभिनयातून करुन दाखवली आहे. कृणाल पांड्यांशी झालेल्या वादानंतर टीम सोडण्याचा प्रमुख खेळाडूचा निर्णय युजवेंद्र चहलनं कुलदीपच्या अभिनयातून या चौघांनाही बरोबर ओळखले आहे. कुलदीप आणि चहल यांच्या केमेस्ट्रीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (Video Viral) होत आहे. श्रीलंका दौऱ्यात भारतीय टीम तीन वनडेमधली पहिली वनडे 18 जुलैला खेळेल. तर 25 जुलैपासून तीन टी-20 मॅचच्या सीरिजला सुरुवात होईल. सीरिजच्या सगळ्या मॅच कोलंबोच्या आर.प्रेमदासा स्टेडियममध्य खेळवल्या जाणार आहेत.
First published:

Tags: India Vs Sri lanka, Kuldeep yadav, Video Viral On Social Media, Yuzvendra Chahal

पुढील बातम्या