मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs SL: भारताविरुद्धच्या पराभवानंतर श्रीलंकेला आणखी एक मोठा धक्का

IND vs SL: भारताविरुद्धच्या पराभवानंतर श्रीलंकेला आणखी एक मोठा धक्का

भारत विरुद्ध श्रीलंका (India vs Sri Lanka) यांच्या वन-डे मालिकेतील दुसऱ्या सामन्यात टीम इंडियानं श्रीलंकेच्या तोंडातील विजयाचा घास हिसकावला. या पराभवानंतर श्रीलंकेच्या क्रिकेट टीमला आणखी एक धक्का बसला आहे.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 22 जुलै: भारत विरुद्ध श्रीलंका (India vs Sri Lanka) यांच्या वन-डे मालिकेतील दुसरा सामना मंगळवारी कोलंबोतील आर. प्रेमदासा स्टेडियमवर झाला. या सामन्यात टीम इंडियानं श्रीलंकेच्या तोंडातील विजयाचा घास हिसकावला. दीपक चहर (Deepak Chahar) आणि भुवनेश्वर कुमार (Buvneshwar Kumar) यांच्या पार्टनरशिपमुळे टीम इंडियाने तो सामना जिंकला. तसेच वन-डे मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. भारताविरुद्धची मालिका गमावल्यानंतर श्रीलंकन क्रिकेट टीमला आणखी एक धक्का बसला आहे.

दुसऱ्या सामन्यात स्लो बॉलिंग केल्याबद्दल आयसीसीनं श्रीलंकेच्या क्रिकेट टीमवर कारवाई केली आहे. स्लो ओव्हर रेटमुळे खेळाडूंना मिळणाऱ्या मॅच फिसमधील 20 टक्के रक्कम कापण्यात येईल. त्याचबरोबर आयसीसी वर्ल्ड सुपर लीग पॉईंट टेबलमध्येही एका पॉईंटचे नुकसान श्रीलंकेला सहन करावे लागेल.

श्रीलंकेनं निर्धारित वेळेत एक ओव्हर कमी टाकल्यानं आयसीसीचे मॅच रेफ्री रंजन मदुगले यांनी ही कारवाई केली आहे. श्रीलंकेची टीम आयसीसी वर्ल्ड सुपर लीग स्पर्धेच्या पॉईंट टेबलमध्ये सध्या 12 व्या नंबरवर आहे. या कारणामुळे श्रीलंकेला तिसऱ्यांदा एक पॉईंट गमवला आहे.

मुरलीधरन निराश

श्रीलंका टीमच्या सध्याच्या कामगिरीवर महान स्पिनर मुथैय्या मुरलीधरन (Muttiah Muralitharan) निराश झाला आहे. ही टीम मॅच जिंकणेच विसरली आहे. देशाच्या खेळाची सध्या बिकट अवस्था आहे, असं मत त्याने व्यक्त केलं आहे.

'ती एक चूक केली नसती तर, 2 कोटी मिळाले असते', चहरची खंत आजही कायम

 ‘श्रीलंकेची टीम गेल्या काही वर्षात कसं जिकांयचं हेच विसरली आहे. चुरशीच्या प्रसंगात काय करावं हेच त्यांना माहिती नाही. लेग स्पिनर वानिंदू हसरंगानं तीन विकेट्स घेतल्या होत्या. भारताची अवस्था 7 आऊट 193 अशी असताना शनाकानं त्याचे ओव्हर्स शिल्लक ठेवले. ही त्याची मोठी चूक होती.

श्रीलंकेनं पहिल्या 10-15 ओव्हरमध्ये तीन विकेट्स घेतल्या तर भारताला संघर्ष करावा लागेल, हे मी यापूर्वीच सांगितले होते. भूवनेश्वर कुमार आणि दीपक चहरनं जोरदार खेळ करत विजय खेचून आणला. श्रीलंकेच्या कॅप्टननं त्यांची विकेट घेण्याचा प्रयत्न करायला हवा होता.' असे मुरलीने सांगितले.

First published:

Tags: Cricket news, Icc, India Vs Sri lanka