Home /News /sport /

IND vs SL: वन-डे मालिकेपूर्वी श्रीलंका टीमबाबत मोठी अपडेट

IND vs SL: वन-डे मालिकेपूर्वी श्रीलंका टीमबाबत मोठी अपडेट

भारत विरुद्ध श्रीलंका (India vs Sri Lanka) यांच्यातील 13 जुलै रोजी सुरु होणारी वन-डे मालिका कोरोनामुळे पुढे ढकलण्यात आली आहे.

    मुंबई, 12 जुलै: भारत विरुद्ध श्रीलंका (India vs Sri Lanka) यांच्यातील 13 जुलै रोजी सुरु होणारी वन-डे मालिका कोरोनामुळे पुढे ढकलण्यात आली आहे. आता नव्या वेळापत्रकानुसार ही मालिका 18 जुलै रोजी सुरू होईल. ही मालिका सुरू होण्यापूर्वी श्रीलंकेच्या टीमसाठी एक चांगली बातमी (Good News) आली आहे. त्यांच्या टीममधील सर्व खेळाडूंचा कोरोना रिपोर्ट हा निगेटीव्ह आला आहे. त्यामुळे या खेळाडूंचा प्रॅक्टीस करण्याचा मार्ग मोकळा झाला. सर्व खेळाडूंना मंगळवारपासून प्रॅक्टीस करण्याची परवानगी देण्यात आली आहे. श्रीलंका बोर्डाने नेमलेल्या आरोग्य सल्लागार समिताीचे अध्यक्ष अर्जुन डी सिल्वा यांच्या शिफारशीनंतर बोर्डाने हा निर्णय घेतला आहे.  श्रीलंका क्रिकेट बोर्डाचे सचिव मोहन डी सिल्वा यांनी ही माहिती दिली आहे. श्रीलंका टीमला कोच आणि सहयोगी स्टाफकडून प्रशिक्षण मिळणार नाही. त्यांना अजूनही आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. कोचिंग स्टाफामधील व्यक्ती बॅटींग कोच ग्रँट फ्लॉवर (Grant Flower) यांच्या संपर्कात होते. इंग्लंड दौऱ्याहून परतल्यानंतर फ्लॉवर आणि कोचिंग स्टाफमधील अन्य एका सदस्याला कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झाले. त्यामुळे कोचिंग स्टाफमधील अन्य व्यक्तींबाबत अधिक खबरदारी घेतली जात आहे. इंग्लंडचा एकाच दिवशी झाला 3 मोठ्या मॅचमध्ये पराभव, टीम इंडियानंही दिला धक्का भारत-श्रीलंका सामन्यांचे वेळापत्रक भारत विरुद्ध श्रीलंका यांच्या मालिकेच्य नव्या वेळापत्रकानुसार (India vs Sri Lanka Series New Schedule) जाहीर करण्यात आले आहे. या वेळापत्रकानुसार 18 जुलै रोजी पहिली वन-डे होणार आहे. दुसरी वन-डे 20 जुलै तर तिसरी वन-डे 23 जुलै रोजी होईल. टी20 सीरिजमधील पहिला सामना 25,  दुसरा सामना 27 तर तिसरा सामना 29 जुलै रोजी होणार आहे. हे सर्व सामने कोलंबोमध्ये खेळवले जातील
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Cricket news, India Vs Sri lanka

    पुढील बातम्या