मुंबई, 3 जुलै : श्रीलंकेला 1996 साली वर्ल्ड चॅम्पियन बनवणारा कॅप्टन अर्जुन रणतुंगाला (Arjuna Ranatunga) त्याच्या क्रिकेट बोर्डानं घरचा आहेर दिला आहे. भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील वन-डे आणि टी20 मालिकेला 13 जुलैपासून सुरुवात होणार आहे. या दौऱ्यासाठी शिखर धवनच्या (Shikhar Dhawan) नेतृत्त्वाखालील टीम इंडिया श्रीलंकेत दाखल झाली आहे. धवनची ही टीम दुय्यम असून यामुळे श्रीलंकेचा अपमान झाल्याची टीका रणतुंगानं केली होती.
श्रीलंका क्रिकेटनं रणतुंगाचा हा दावा फेटाळला आहे. 'भारतीय टीममधील 20 पैकी 14 खेळाडूंना आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा अनुभव आहे. ही दुय्यम दर्जाची टीम नाही. क्रिकेट विश्वात विशेषत: आयसीसीच्या पूर्णवेळ सदस्य देशांमध्ये वेगवेगळ्या प्रकारासाठी भिन्न टीम निवडण्याची पद्धत आहे.' असं श्रीलंका बोर्डानं स्पष्ट केले आहे.
काय म्हणाला रणतुंगा?
भारताने दुसऱ्या श्रेणीची टीम पाठवणं हा आमच्या क्रिकेटचा अपमान आहे. टीव्ही आणि मार्केटिंगच्या गरजा पूर्ण करण्यासाठी ही सीरिज खेळवायला तयार झालेल्या श्रीलंका क्रिकेट बोर्डाला मी दोषी मानतो. श्रीलंका क्रिकेटसाठी हे लाजीरवाणं आहे. भारताने त्यांची सर्वोत्तम टीम इंग्लंडला पाठवली आहे, तर दुय्यम टीम इकडे खेळणार आहे,' असं रणतुंगा म्हणाला होता.
भारताचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि उपकर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) यांच्यासह महत्त्वाचे खेळाडू इंग्लंड दौऱ्यावर आहेत, त्यामुळे श्रीलंका दौऱ्यासाठी नवोदितांना संधी देण्यात आली आहे. या टीममधील सहा खेळाडूंनी अद्याप आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेलं नाही.
अजब योगायोग! एकाच दिवशी मॅचच्या शेवटच्या 3 बॉलवर दोघांची HATTRICK
श्रीलंकेची टीम कमकुवत
रणतुंगानं टीम इंडियाला दुय्यम टीम म्हंटलं असलं तरी गेल्या वर्षभरात श्रीलंकेच्या मुख्य टीमनं दुय्यम टीमपेक्षाही खराब आहे. गेल्या वर्षभरात श्रीलंकेनं क्रिकेटच्या तीन प्रकारात मिळून 22 सामने खेळले आहेत. यापैकी फक्त 3 सामन्यांमध्ये त्यांना विजय मिळाला आहे. 16 मध्ये पराभव झाला असून तीन सामने ड्रॉ झाले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket news, India Vs Sri lanka, Team india