मुंबई, 10 जुलै : भारत विरुद्ध श्रीलंका (IND vs SL) यांच्यातील वन-डे आणि टी20 मालिकेवर कोरोना व्हायरसचं संकट वाढलंय. श्रीलंकेचे बॅटींग कोट ग्रँट फ्लॉवर (Grant Flower) आणि सपोर्ट स्टाफ जीटी निराशेन (GT Niroshan) या दोघांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यानंतर श्रीलंका क्रिकेट बोर्डानं (SLC) या मालिकेचं वेळापत्रक बदलण्याची विनंती बीसीसीआयला (BCCI) केली होती. बीसीसीआयनं ती विनंती मान्य केली. त्यानंतर भारतीय क्रिकेट नियामक बोर्डाच्या मागणीनंतर श्रीलंका क्रिकेट बोर्डाला एका मोठा निर्णय घ्यावा लागला आहे.
बीसीसीआयनं श्रीलंकेच्या क्रिकेटपटूंचे हॉटेल बदलण्यात यावे अशी मागणी केली होती. या मागणीनंतर श्रीलंकेच्या सर्व खेळाडूंना कोलंबोतील ग्रँड सिनामन हॉटेलमध्ये शिफ्ट करण्यात आले आहे. यापूर्वी दोन्ही टीम ताज समुद्रा हॉटेलमध्ये एकत्र होत्या. टीम इंडियामध्ये कोरोनाचा शिरकाव होऊ नये म्हणून बीसीसीआयनं ही विनंती केली होती. आता श्रीलंका टीमचे नवे हॉटेल भारतीय क्रिकेट टीमच्या हॉटेलपासून 1.5 किलोमीटर दूर आहे.
सचिन-द्रविडची विकेट घेणाऱ्या बॉलरवर आली होती लोकांकडं पैसे मागण्याची वेळ
भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात 13 जुलैपासून वन-डे मालिकाची सुरुवात होणार होती. मात्र आता शेड्यूलमध्ये बदल करण्यात आला आहे. आता वनडे मालिकेचा पहिला सामना 18 जुलै रोजी खेळला जाईल.बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BCCI, Coronavirus, India Vs Sri lanka