• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • IND vs SL: कोहली-शास्त्रीचं ‘खास मिशन’ Shikhar Dhawan करणार पूर्ण

IND vs SL: कोहली-शास्त्रीचं ‘खास मिशन’ Shikhar Dhawan करणार पूर्ण

 • Share this:
  कोलंबो, 18 जुलै: भारत विरुद्ध श्रीलंका (India vs Sri Lanka) यांच्यातील वन-डे मालिकेला रविवारी सुरुवात होत आहे. टीम इंडियाच्या अनुभवी आणि नवोदीत खेळाडूंची परीक्षा या दौऱ्यावर होणार आहे. या दौऱ्यासाठी एकूण 20 जणांची निवड करण्यात आली आहे. त्यापैकी कोणत्या 11 जणांना अंतिम संघात प्रवेश मिळणार याचा निकष कॅप्टन शिखर धवन (Shikhar Dhawan) याने स्पष्ट केला आहे. ही मालिका श्रीलंकेत होत असली तरी दूर इंग्लंडमध्ये असलेला टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) आणि कोच रवी शास्त्री (Ravi Shastri) यांचे मिशन आपण पूर्ण करणार असल्याचं धवननं स्पष्ट केलं आहे. काय आहे मिशन? शिखर धवननं पत्रकारांशी बोलताना सांगितले की, ‘विराट कोहली आणि रवी शास्त्री यांच्या डोक्यात कुणी विशेष खेळाडू टी20 वर्ल्ड कपसाठी असेल तर टीम मॅनेजमेंट त्याला नक्की संधी देईल. माझी विराट भाई आणि रवी भाई यांच्याशी या विषयावर चर्चा झालेली नाही. पण मला खात्री आहे की त्यांची निवड समिती आणि राहुल भाई यांच्याशी या विषयावर चर्चा झाली असेल. त्यांचा संदेश आम्हाला देण्यात येईल. या मालिकेत टी20 वर्ल्ड कपचा विचार करुन खेळाडूंना खेळवले जाईल. टी20 वर्ल्ड कपपूर्वी एखाद्या खेळाडूचा खेळ पाहण्यासाठी ही एकच मालिका आहे.’ शिखर धवननं यावेळी प्लेईंग 11 बद्दल खुलासा केला नाही, मात्र त्याचा जोडीदार कोण असेल याचा निर्णय झाला असल्याचं सांगितले. IND vs SL : नव्या टीम इंडियाची आज पहिली परीक्षा, वाचा कसं आहे आजचं हवामान एका नावाची घोषणा श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) खेळणार असल्याचं टीमचा कर्णधार शिखर धवन (Shikhar Dhawan) याने स्पष्ट केलं आहे. सूर्यकुमार यादव इंग्लंडविरुद्धच्या सीरिजमध्ये टी-20 मॅच खेळला, पण त्याला वनडेमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली नव्हती. आता श्रीलंकेविरुद्धच्या मॅचमधून तो वनडे क्रिकेटमध्येही पाऊल ठेवेल. सूर्यकुमार यादवचं लिस्ट ए मधलं रेकॉर्ड दमदार आहे. 98 मॅचमध्ये त्याने 37.55 च्या सरासरीने 2,779 रन केले आहेत, यामध्ये 3 शतकं आणि 17 अर्धशतकांचा समावेश आहे. त्याचा स्ट्राईक रेटही 100 पेक्षा जास्त आहे. सूर्यकुमार यादवने त्याच्या पहिल्याच आंतरराष्ट्रीय टी-20 इनिंगमध्ये अर्धशतक केलं होतं.
  Published by:News18 Desk
  First published: