Home /News /sport /

IND vs SA: विराट कोहलीनं अखेर मौन सोडलं, वन-डे सीरिजमधील ब्रेकबाबत म्हणाला...

IND vs SA: विराट कोहलीनं अखेर मौन सोडलं, वन-डे सीरिजमधील ब्रेकबाबत म्हणाला...

टीम इंडियाच्या टेस्ट टीमचा कॅप्टन विराट कोहलीने (Virat Kohli) मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत गेल्या काही दिवसांपासून गाजत असलेल्य़ा प्रश्नांना उत्तरं दिली आहेत.

    मुंबई, 15 डिसेंबर : टीम इंडियाच्या टेस्ट टीमचा कॅप्टन विराट कोहलीने (Virat Kohli) मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत गेल्या काही दिवसांपासून गाजत असलेल्य़ा प्रश्नांना उत्तरं दिली आहेत. विराट कोहली दक्षिण आफ्रिकेतील टेस्ट सीरिजनंतर (India vs South Africa Test Series) ब्रेक घेणार आहे. वन-डे सीरिज खेळणार नाही, असे वृत्त प्रसिद्ध झाले होते. विराटने या विषयावर स्पष्टीकरण दिले आहे. टीम इंडिया गुरुवारी दक्षिण आफ्रिकेला रवाना होणार आहे. 3 टेस्ट आणि 3 वन-डे सामन्यांची ही सीरिज आहे. काय म्हणाला विराट? 'या प्रकारचे वृत्त लिहिणाऱ्या व्यक्तींना आणि त्यांच्या सूत्रांनी तुम्ही हे प्रश्न विचारा. ही सर्व मंडळी विश्वासर्ह नाहीत. मी नेहमीच वन-डे सीरिजच्या निवडीसाठी उपलब्ध आहे. यापूर्वी देखील उपलब्ध होतो.' या शब्दात विराटने दक्षिण आफ्रिकेविरुद्धची वन-डे सीरिज खेळणार नसल्याची शक्यता फेटाळून लावली आहे. विराटला त्याची मुलगी वामिकाचा पहिला वाढदिवस साजरा करण्यासाठी वेळ हवा आहे.वामिकाचा पहिला वाढदिवस 11 जानेवारी रोजी आहे. विराट टेस्ट सीरिजनंतर वामिकाचा वाढदिवस साजरी करण्यासाठी सुट्टीचं नियोजन करत आहे. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका वन-डे सीरिज 19 जानेवारीपासून सुरू होणार आहे. या काळात विराट सुट्टीवर असेल, असे वृत्त प्रसिद्ध झाले होते. विराटने हे वृत्त निराधार असल्याचे म्हंटले आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वीच विराट कोहलीच्या जागी रोहित शर्माची वन-डे टीमचा कॅप्टन म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यापूर्वी टी20 टीमचा कॅप्टनही रोहितला करण्यात आले आहे. तर विराट कोहली आता फक्त टेस्ट टीमचा कॅप्टन आहे. या सर्व निर्णयानंतर विराट नाराज असून त्याच्यात आणि रोहितमध्ये मतभेद असल्याची चर्चा सुरू होती. विराटने मुंबईतील पत्रकार परिषदेत ही सर्व चर्चा फेटाळली आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    पुढील बातम्या