Home /News /sport /

IND vs SA, Live Streaming: टीम इंडिया इतिहास घडवण्यासाठी मैदानात उतरणार, कधी आणि कुठे पाहता येणार मॅच

IND vs SA, Live Streaming: टीम इंडिया इतिहास घडवण्यासाठी मैदानात उतरणार, कधी आणि कुठे पाहता येणार मॅच

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यातील पहिल्या टेस्टला आज (रविवार) सेंच्युरियनमध्ये सुरूवात होणार आहे.

    मुंबई, 26 डिसेंबर : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यातील पहिल्या टेस्टला आज (रविवार) सेंच्युरियनमध्ये सुरूवात होणार आहे. टीम इंडियाला आजवर एकदाही दक्षिण आफ्रिकेत टेस्ट सीरिज जिंकता आलेली नाही. यावर्षी ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमध्ये दमदार कामगिरी केलेली टीम इंडिया आफ्रिकेतही नवा इतिहास घडवण्यासाठी मैदानात उतरणार आहे. या मॅचच्या आदल्या दिवशी टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडने (Rahul Dravid) प्लेयिंग इलेव्हनबाबत कोणतेही संकेत दिले नाहीत, पण टीममध्ये स्थान मिळवण्यासाठी कठीण संवादाबाबत द्रविड बोलला आहे. टीममध्ये निवड झाली नाही आणि खेळाडू नाराज झाले तर ती चांगली गोष्ट आहे, कारण यामुळे त्यांना टीममध्ये स्थान मिळवण्याचं महत्त्व माहिती आहे, असं द्रविडने स्पष्ट केले आहे. IND vs SA, Weather Forecast: पहिल्या टेस्टवर काळे ढग, पाहा कसं आहे आजचं हवामान भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिली टेस्ट कधी सुरू होईल? भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिली टेस्ट 26 डिसेंबर (रविवार) पासून सुरू होणार आहे. ही मॅच भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 1.30 वाजता सुरू होईल. तर टॉस दुपारी 1.00 वाजता होणार आहे. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिली टेस्ट कुठे होणार आहे? भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिली टेस्ट सेंच्युरियन स्पोर्ट्स पार्कवर खेळली जाणार आहे. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिली टेस्टचे लाईव्ह प्रसारण कुठे पाहता येईल? भारतामध्ये  टेस्टचे लाईव्ह प्रसारण 'स्टार स्पोर्ट्स नेटवर्क'वर पाहता येणार आहे. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिली टेस्टचे Live Streaming कुठे पाहता येईल? पहिल्या टेस्टचे लाईव्ह स्ट्रिमिंग डिस्ने प्लस-हॉटस्टारवर पाहता येणार आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Cricket, Cricket news, South africa, Team india

    पुढील बातम्या