मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

Kohli vs Ganguly: विराट कोहलीला मिळाली दक्षिण आफ्रिकन खेळाडूची साथ, म्हणाला...

Kohli vs Ganguly: विराट कोहलीला मिळाली दक्षिण आफ्रिकन खेळाडूची साथ, म्हणाला...

विराट कोहलीला (Virat Kohli) वन-डे टीमच्या कॅप्टन पदावरून हटवण्यात आले आहे. या प्रकरणाचे पडसाद अद्याप उमटत आहेत. या प्रकरणात दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेटपटूनं विराटला पाठिंबा दिला आहे.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 17 डिसेंबर : विराट कोहलीला (Virat Kohli) वन-डे टीमच्या कॅप्टन पदावरून हटवण्यात आले आहे. या प्रकरणाचे पडसाद अद्याप उमटत आहेत. विराटनं बुधवारी मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्याच्यात आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांच्यात एकवाक्यता नव्हती. भारतीय क्रिकेटमधील विसंवाद त्या दिवशी जग जाहीर झाला. विराटच्या पत्रकार परिषदेनंतर क्रिकेट विश्वात वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. काही जणांनी विराटवर टीका केलीय. तर दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेटपटूनं विराटला पाठिंबा दिला आहे.

दक्षिण आफ्रिकेचा (South Africa) स्पिनर तबरेज शम्सी यानं (Tabraiz Shamsi) या प्रकरणात विराटला पाठिंबा दिला आहे. शम्सीनं एका क्रिकेट फॅनच्या ट्विटचा दाखला घेत विराटची बाजू घेतली आहे. 'सौरव गांगुलीनं सांगितलेल्या गोष्टीला दुजोरा देणे हा विराटसाठी सुरक्षित पर्यात होताय पण विराट मैदानात असो किंवा मैदानाच्या बाहेर त्या प्रकारचा व्यक्ती नाही.' असं ट्विट एका फॅनने केले आहे. शम्सीने ते रिट्विट करत, 'याच कारणामुळे तो इतका चांगला आहे,' अशी प्रतिक्रिया दिली आहे.

विराट कोहलीने  बुधवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत  टी-20 कॅप्टन्सीबाबत बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने सांगितलेला दावाच खोडून काढला. विराटला टी-20 टीमची कॅप्टन्सी सोडू नकोस असं सांगण्यात आलं होतं, पण तो निर्णयावर ठाम होता. निवड समितीला टी-20 आणि वनडे टीमसाठी एकच कर्णधार हवा होता, असं गांगुली म्हणाले होते. विराट कोहलीने मात्र त्याच्या पत्रकार परिषदेत वेगळंच सांगितलं. टी-20 टीमची कॅप्टन्सी सोडल्यानंतर माझं या मुद्द्यावर बीसीसीआयशी कोणतंही बोलणं झालं नाही. मला कधीही टी-20 टीमचं नेतृत्व सोडू नकोस, असं सांगण्यात आलं नाही, असं स्पष्टीकरण विराटने दिलं.

T20 क्रिकेटला मिळाला नवा बॉस, वर्षभरात काढले 2000 रन

दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी टेस्ट टीमची घोषणा व्हायच्या दीड तास आधी मला वनडे टीमच्या कॅप्टन्सीवरून हटवण्यात आल्याचं सांगण्यात आलं, असं विराट म्हणाला. टी-20 टीमची कॅप्टन्सी सोडण्याआधी आपण बीसीसीआयला याबाबत माहिती दिली, पण याबाबत बीसीसीआयसोबत काहीच बोलणं झालं नाही, असा दावा विराटने केला.

First published:

Tags: BCCI, Sourav ganguly, Virat kohli