Home /News /sport /

IND vs SA : टीम इंडियाविरुद्ध सीरिज जिंकल्यानंतर आफ्रिकेला धक्का, ICC नं सुनावली शिक्षा

IND vs SA : टीम इंडियाविरुद्ध सीरिज जिंकल्यानंतर आफ्रिकेला धक्का, ICC नं सुनावली शिक्षा

दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट टीमची (South Africa Cricket Team) कामगिरी सध्या दमदार होत आहे. या टीमनं टेस्ट पाठोपाठ वन-डे मालिका देखील जिंकली. त्याचवेळी त्यांच्या टीमला एक धक्का देखील बसला आहे.

    मुंबई, 23 जानेवारी : दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट टीमची (South Africa Cricket Team) कामगिरी सध्या दमदार होत आहे. या टीमनं टेस्ट पाठोपाठ वन-डे मालिका देखील जिंकली आहे. शुक्रवारी झालेल्या लढतीत (India vs South Africa) टीम इंडियाचा 7 विकेट्सनं  पराभव करत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. या मालिका विजयाचा आनंद साजरा करणाऱ्या आफ्रिका टीमच्या आनंदात खडा पडला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या टीमला दुसऱ्या वन-डेमध्ये स्लो ओव्हर रेटमुळे दंड सुनावण्यात आला आहे. मॅच फिसमधील 20 टक्के रक्कम कमी करण्यात आली आहे. आंतरराष्ट्री क्रिकेट कौन्सिलनं (ICC) शनिवारी ही माहिती दिली. दक्षिण आफ्रिकेनं निर्धारित वेळेत एक ओव्हर कमी बॉलिंग केली, त्यामुळे मॅच रेफ्री अ‍ॅण्डी पायक्रॉफ्ट यांनी ही शिक्षा सुनावली आहे. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरी वन-डे रविवारी केपटाऊनमध्ये होणार आहे. शेवटच्या वन-डेमध्ये टीम इंडियाची प्रतिष्ठा पणाला लागलेली असेल. शेवटची वन-डे जिंकून व्हाईट वॉशची नामुश्की टाळण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न असेल. दक्षिण आफ्रिकेचा कॅप्टन टेम्बा बाऊमाने यापूर्वीच या मालिकेत भारतीय टीमला क्लीन स्वीप देण्याचा इरादा जाहीर केला आहे. भारतीय क्रिकेटचा नवा ‘राज’, 22 बॉलमध्ये काढले 104 रन! टीम इंडियाचा 326 रनने विजय दोन्ही टीम या प्रकारे आहेत टीम इंडिया :  केएल राहुल (कॅप्टन), जसप्रीत बुमराह, शिखर धवन,ऋतूराज  गायकवाड़, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, वेंकटेश अय्यर, ऋषभ पंत (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), युजवेंद्र चहल, आर अश्विन , भुवनेश्वर कुमार, दीपक चाहर, प्रसिद्ध कृष्णा, शार्दूल ठाकुर, मोहम्मद सिराज, जयंत यादव आणि नवदीप सैनी. दक्षिण अफ्रीका: टेम्बा बाऊमा (कप्तान), केशव महाराज, क्विंटन डिकॉक (विकेटकीपर), जुबैर हमजा, मार्को यानसेन, जानेमन मलान, सिसांडा मगाला, एडेन मार्करम, डेविड मिलर, लुंगी एनगिडी, वायने पर्नेल, एंडिले फेलुकवायो, ड्वेन प्रिटोरियस, तबरेज शम्सी, रासी वैन डर डुसेन आणि  काइल वेरेने.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: South africa, Team india

    पुढील बातम्या