मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs SA: 29 वर्षांचा इतिहास 'तो' बदलणार, गांगुलीचा विराटवरील विश्वास अद्याप कायम

IND vs SA: 29 वर्षांचा इतिहास 'तो' बदलणार, गांगुलीचा विराटवरील विश्वास अद्याप कायम

भारतीय क्रिकेटमध्ये विराट कोहली विरुद्ध सौरव गांगुली (Virat Kohli vs Sourav Ganguly) असे दोन गट पडल्याचे सध्या चित्र आहे. या प्रकरणात वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. त्यानंतरही गांगुलीचा विराटवरील विश्वास कायम आहे.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 17 डिसेंबर : भारतीय क्रिकेटमध्ये विराट कोहली विरुद्ध सौरव गांगुली (Virat Kohli vs Sourav Ganguly) असे दोन गट पडल्याचे सध्या चित्र आहे. विराटने दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाण्यापूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेनंतर हे चित्र निर्माण झाले आहे. या पत्रकार परिषदेत त्याने बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांचा दावा फेटाळला होता. गांगुलीने या प्रकरणात काहीही उत्तर देण्यास नकार दिला असला तरी हे प्रकरण बीसीसीआय आपल्या पद्धतीने हाताळेल असे जाहीर केले आहे.

कोहली आणि गांगुली (Kohli vs Ganguly) या भारतीय क्रिकेटमधील दोन सत्ताकेंद्रात मैदानाच्या बाहेर वाद सुरू आहे. पण गांगुली यांना आजही विराटच्या मैदानातील क्षमतेवर पूर्ण विश्वास आहे. टीम इंडिया आजवर एकदाही दक्षिण आफ्रिकेत टेस्ट सीरिज जिंकू शकलेली नाही.विराटच्या कॅप्टनसीमध्ये गेल्या 29 वर्षांचा इतिहास बदलेल, असा विश्वास गांगुली यांनी व्यक्त केला आहे.

क्रीडा पत्रकार बोरिया मजुमदार यांना दिलेल्या मुलाखतीमध्ये गांगुली यांनी हा विश्वास व्यक्त केला आहे. टीम इंडियाला यंदा दक्षिण आफ्रिकेत टेस्ट सीरिज जिंकण्याची सर्वोत्तम संधी असल्याचे गांगुली यांनी म्हंटले आहे. टीम इंडियाने गेल्या काही वर्षात विदेशात जोरदार कामगिरी केली आहे. भारतीय टीमनं ऑस्ट्रेलिया टीमला त्यांच्याच देशात दोन वेळा टेस्ट सीरिजमध्ये हरवले आहे. त्याचबरोबर इंग्लंड विरुद्धच्या सीरिजमध्येही 2-1 अशी आघाडी घेतली होती.

Kohli vs Ganguly: विराट कोहलीला मिळाली दक्षिण आफ्रिकन खेळाडूची साथ, म्हणाला...

टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेतील रेकॉर्ड साधारण आहे. भारतीय टीमनं दक्षिण आफ्रिकेत आजवर 20 टेस्ट मॅच  खेळल्या असून त्यापैकी फक्त 3 जिंकल्या आहेत. टीम इंडियाला दक्षिण आफ्रिकेत आजवर एकदाही टेस्ट सीरिज जिंकता आलेली नाही. 2018 साली आफ्रिकेत झालेली टेस्ट सीरिज भारतीय टीमनं 1-2 अशा फरकानं गमावली होती.

टीम इंडियाच्या टेस्ट टीमचा व्हाईस कॅप्टन रोहित शर्मानं (Rohit Sharma) दुखापतीमुळे ऐनवेळी या दौऱ्यातून माघार घेतली. रविंद्र जडेजा, अक्षर पटेल आणि शुभमन गिल हे प्रमुख खेळाडू देखील दुखापतीमुळेच दक्षिण आफ्रिकेत जाऊ शकले नाहीत. तरीही गांगुली यांनी विराटवर पूर्ण विश्वास दाखवत तो दक्षिण आफ्रिकेत टेस्ट सीरिज जिंकेल असे भाकित व्यक्त केला आहे.

First published:

Tags: Cricket news, Sourav ganguly, South africa, Virat kohli