Home /News /sport /

टीम इंडियाला मिळाला जडेजा-अक्षरचा वारसदार, धोनीशी आहे खास कनेक्शन

टीम इंडियाला मिळाला जडेजा-अक्षरचा वारसदार, धोनीशी आहे खास कनेक्शन

दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील टीम इंडियात रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) आणि अक्षर पटेल (Axar Patel) या दोन प्रमुख खेळाडूंचा दुखापतीमुळे समावेश करण्यात आलेला नाही. पण त्यांचा वारसदार म्हणून एका खास खेळाडूची निवड करण्यात आली आहे.

    मुंबई, 9 डिसेंबर : दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील टेस्ट सीरिजसाठी भारतीय क्रिकेट टीमची (Team India) घोषणा करण्यात आली आहे.  या टीममध्ये रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) आणि अक्षर पटेल (Axar Patel) या दोन प्रमुख खेळाडूंचा दुखापतीमुळे समावेश करण्यात आलेला नाही. त्यांच्या अनुपस्थितीमध्ये मुंबई टेस्ट गाजवणाऱ्या जयंत यादवची (Jayant Yadav) आफ्रिका दौऱ्यातील टीममध्ये निवड झाली आहे. त्याचबरोबर जडेजा आणि अक्षरचा वारसदार म्हणून एका खास खेळाडूची निवड टीम इंडियात करण्यात आली आहे. निवड समितीनं या दौऱ्यासाठा उत्तर प्रदेशचा स्पिन ऑल राऊंडर सौरभ कुमारची (Sourabh Kumar) निवड केली आहे. तो टीम इंडियातील तिसरा स्पिनर असेल. अर्थात त्याची निवड सध्या स्टँड बाय म्हणून करण्यात आलीय, 28 वर्षांच्या सौरभची यापूर्वी भारत विरुद्ध इंग्लंड (India vs England) यांच्यात फेब्रुवारी महिन्यात झालेल्या टेस्ट सीरिजमध्ये नेट बॉलर म्हणून निवड करण्यात आली होती. देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करत सौरभनं निवड समितीचं लक्ष स्वत:कडे वेधले आहे. सौरभ सध्या इंडिया ए च्या टीमसोबत दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर आहे. या दौऱ्यातही त्याने चांगली बॉलिंग केली आहे. सौरभ फक्त स्पिन बॉलिंगच नाही तर चांगली बॅटींग देखील करू शकतो. देशांतर्गत स्पर्धेतील त्याचा रेकॉर्ड याचे उदाहरण आहे. त्याने फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये 2 शतक आणि 8 अर्धशतक झळकाली आहेत. त्याचबरोबर 223 फोर आणि 17 सिक्स देखील लगावले आहेत. Ashes Series : बेन स्टोक्सच्या ओव्हरमध्ये अंपायरकडून मोठी चूक, VIDEO पाहून बसणार नाही विश्वास! धोनीशी कनेक्शन सौरभने 2018-19 च्या रणजी सिझनमधील 10 मॅचमध्ये 17.74 च्या सरासरीनं 51 विकेट्स घेतल्या होत्या. त्यानं आजवर 45 फर्स्ट क्लास मॅच खेळल्या असून त्यामध्ये 194 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच त्याचा इकोनॉमी रेट हा 2.70 इतका कमी आहे. उत्तर प्रदेशच्या सौरभचं टीम इंडियाचा माजी कॅप्टन महेंद्रसिंह धोनीशी (MS Dhoni) खास कनेक्शन आहे. 2017 साली धोनीच्या रायझिंग पुणे सुपर जायंट्सनी त्याला आयपीएल लिलावात खरेदी केले होते. मात्र त्याला एकही मॅच खेळण्याची संधी मिळाली नाही. दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील भारतीय टीम विराट कोहली (कॅप्टन), रोहित शर्मा ( व्हाईस कॅप्टन), लोकेश राहुल, मयांक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, रिषभ पंत, वृद्धीमान सहा, आर अश्वीन, जयंत यादव, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, उमेश यादव, जसप्रीत बुमराह, शार्दूल ठाकूर आणि मोहम्मद सिराज. स्टँडबाय खेळाडू : नवदीप सैनी, सौरभ कुमार, दीपक चहर, अर्जन नागासवाला.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Cricket news, Team india

    पुढील बातम्या