Home /News /sport /

IND vs SA : रोहित शर्माची निवड का झाली नाही? उघड झालं नेमकं कारण

IND vs SA : रोहित शर्माची निवड का झाली नाही? उघड झालं नेमकं कारण

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील वन-डे सीरिजला (India vs South Africa ODI Series) 19 जानेवारीपासून सुरूवात होत आहे. या सीरिजसाठी रोहित शर्माची (Rohit Sharma) निवड का झाली नाही? याचे नेमके कारण उघड झाले आहे.

    मुंबई, 1 डिसेंबर : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील वन-डे सीरिजला (India vs South Africa ODI Series) 19 जानेवारीपासून सुरूवात होत आहे. या सीरिजमध्ये केएल राहुल (KL Rahul) टीम इंडियाचा कॅप्टन असेल. रोहित शर्माचा (Rohit Sharma) दुखापतीमुळे टीममध्ये समावेश करण्यात आलेला नाही. निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा (Chetan Sharma) यांनी रोहितचा टीममध्ये समावेश का करण्यात आला नाही याचे कारण सांगितले आहे. टीम इंडियाची निवड झाल्यानंतर पत्रकारांशी बोलताना शर्मा म्हणाले की, 'पुढील काळात महत्त्वाच्या सीरिज आहेत. तसेच यावर्षी टी20 वर्ल्ड कप देखील होणार आहे. त्यामुळे आम्ही रोहितच्या फिटनेसवर आणखी फोकस करण्याचे ठरवले आहे.' या सीरिजमध्ये केएल राहुल कॅप्टन तर जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) व्हाईस कॅप्टन असेल. विराट कोहलीचाही (Virat Kohli) टीममध्ये समावेश करण्यात आला आहे. दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या वन-डे सीरिजसाठी 18 सदस्यांची निवड झाल्यानंतर शर्मा यांनी सांगितलं की, 'सध्या भरपूर क्रिकेट होत आहे. कोणताही खेळाडू जाणीवपूर्वक दुखापतग्रस्त होत नाही. प्रत्येकालाच  खेळण्याची इच्छा असते. याच कारणामुळे पुढील महत्त्वाच्या सीरिज तसेच वर्ल्ड कपचा विचार करत रोहितची निवड या सीरिजसाठी करण्यात आली नाही. दक्षिण आफ्रिका विरुद्ध होणाऱ्या वन-डे मालिकेसाठी ओपनिंग बॅटर ऋतुराज गायकवाड ( Ruturaj Gaikwad) आणि ऑल राऊंडर व्यंकटेश अय्यर (Venkatesh Iyer) यांची निवड करण्यात आली आहे. या दोघांनीही विजय हजारे स्पर्धेत जोरदार कामगिरी केली होती. गायकवाडनं 5 मॅचमध्ये 150.75 च्या सरासरीनं 603 रन केले, यामध्ये 4 शतकांचा समावेश आहे. तर, व्यंकटेश अय्यरनंही या स्पर्धेत 70 पेक्षा जास्त सरासरीनं रन करत दावेदारी सादर केली होती. त्याचबरोबर अनुभवी बॅटर शिखर धवनच्या (Shikhar Dhawan) ला सुद्धा संधी देण्यात आली आहे. धवनसाठी विजय हजारे स्पर्धा निराशाजनक ठरली. मात्र 2021 या वर्षात तो टीम इंडियाकडून वन-डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक रन करणारा बॅटर आहे, त्यामुळेच त्याला संधी देण्यात आली. रवी शास्त्रींनी - रणवीरसोबतचा Dance Video शेअर करत केले नववर्षाचे स्वागत टीम इंडिया : केएल राहुल (कॅप्टन), शिखर धवन, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, सूर्य कुमार यादव, श्रेयस अय्यर, व्यंकटेश अय्यर, ऋषभ पंत (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), वाय चहल, आर अश्विन, वाश्गिटन सुंदर, जसप्रीत बुमराह (व्हाईस कॅप्टन), भुवनेश्वर कुमार, दीपक चहर, प्रसीद्ध कृष्णा, शार्दुल ठाकूर आणि मोहम्मद सिराज
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Cricket news, Rohit sharma, Team india

    पुढील बातम्या