Home /News /sport /

IND vs SA: ऋषभ पंतनं लगावला दक्षिण आफ्रिकेच्या कॅप्टनला टोला, पाहा VIDEO

IND vs SA: ऋषभ पंतनं लगावला दक्षिण आफ्रिकेच्या कॅप्टनला टोला, पाहा VIDEO

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यात जोहान्सबर्गमध्ये सुरू असलेली टेस्ट रंगतदार अवस्थेत आहे. या टेस्टच्या तिसऱ्या दिवशी ऋषभ पंतनं (Rishabh Pant) केलेली एक कृती कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

    मुंबई, 6 जानेवारी : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यात जोहान्सबर्गमध्ये सुरू असलेली टेस्ट रंगतदार अवस्थेत आहे. दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 122 रनची आवश्यकता असून त्यांच्या 8 विकेट्स शिल्लक आहेत. टीम इंडियाने दिलेले 240 रनच्या टार्गेटचा पाठलाग करताना यजमान टीमनं तिसऱ्या दिवसाच्या अखेरीस 2 आऊट 118 रन केले आहेत.  तिसऱ्या दिवशी टीम इंडियाचा विकेट किपर ऋषभ पंत (Rishabh Pant) याने दक्षिण आफ्रिकेचा कॅप्टन डीन एल्गारला (Dean Elgar) टोला लगावला. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाला आहे. काय घडला प्रकार? दक्षिण आफ्रिकेच्या दुसऱ्या इनिंगमधील 28 व्या ओव्हरमध्ये हा प्रकार घडला. आर. अश्विननं टाकलेला बॉल वेगानं आतमध्ये आला. त्यावर फ्लिक करण्याचा पीटरसनचा प्रयत्न फसला आणि बॉल पॅडवर आदळला. भारतीय खेळांडूनी केलेले अपिल अंपायरनी मान्य केले. त्यामुळे भारताला दुसरी विकेट मिळाली. यावेळी पीटरसन आणि एल्गार यांच्यात चर्चा सुरू होती. त्यांचा निर्णय होईपर्यंत डीआरएस घेण्याचा वेळ समाप्त झाला. ऋषभ पंतनं ही संधी साधत दक्षिण आफ्रिकेच्या कॅप्टनला टोला लगावला. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. पीटरसन आऊट झाल्यानंतर 'जबरदस्त कॅप्टन आहे. स्वत:साठीच विचार करतो.' असा टोला पंतनं लगावला.  एल्गारनं डीआरएस घेण्यास वेळ लावल्यानं पंतनं हा टोला लगावला. IND vs SA: 'लॉर्ड' हे नाव कसे मिळाले? स्वत: शार्दुलनंच केला खुलासा, VIDEO जोहान्सबर्ग टेस्टमध्ये रंगत तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा दक्षिण आफ्रिकेचा स्कोअर 2 आऊट 118 असा होता. कॅप्टन डीन एल्गार (Dean Elgar) 46 रनवर तर रस्सी व्हॅन डर डुसेन 11 रनवर खेळत आहेत. भारताला दक्षिण आफ्रिकेमध्ये अजून एकदाही टेस्ट सीरिज जिंकता आलेली नाही. याआधी सेंच्युरियनमध्ये झालेल्या पहिल्या टेस्टमध्ये भारताने शानदार विजय मिळवला होता. आता या टेस्टमध्ये विजय मिळवून पहिल्यांदाच दक्षिण आफ्रिकेत सीरिज जिंकत इतिहास घडवण्याची संधी टीम इंडियाला आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Cricket, Rishabh pant, Team india

    पुढील बातम्या