Home /News /sport /

IND vs SA : धोनीच्या सहकाऱ्यानं सांगितलं टीम इंडियाच्या पराभवाचं मोठं कारण

IND vs SA : धोनीच्या सहकाऱ्यानं सांगितलं टीम इंडियाच्या पराभवाचं मोठं कारण

भारतीय टीम दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (India vs South Africa) टेस्ट सीरिज गमावल्यानंतर वन-डे सीरिजमध्येही पराभूत झाली आहे.

    मुंबई, 22 जानेवारी : भारतीय टीम दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (India vs South Africa) टेस्ट सीरिज गमावल्यानंतर वन-डे सीरिजमध्येही पराभूत झाली आहे. टीम इंडियाचा टेस्ट सीरिजमध्ये 1-2 या फरकाने पराभव झाला. तर 3 सामन्यांच्या मालिकेत दक्षिण आफ्रिकेनं 2-0 अशी आघाडी घेतली आहे. बॉलिंग आणि बॅटींग या दोन्ही विभागात भारतीय टीमनं वन-डे सीरिजमध्ये निराशा केली आहे. दक्षिण आफ्रिकेचा फास्ट बॉलर इम्रान ताहिरनं  (Imran Tahir) भारतीय टीमच्या पराभवाचं मोठं कारण सांगितलं आहे. महेंद्रसिंह धोनीच्या (MS Dhoni) चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) टीमचा ताहीर मुख्य सदस्य होता. टीम इंडियाचा अती आत्मविश्वासामुळे टेस्ट आणि वन-डे सीरिजमध्ये पराभव झाला, असं मत ताहीरनं व्यक्त केलं आहे. लिजेंड क्रिकेट लीग स्पर्धेत वर्ल्ड जायंट्स टीमचा ताहीर सदस्य असून त्या स्पर्धेसाठी तो सध्या ओमानमध्ये आहे. 'कोणत्याही टीमला कमी लेखता कामा नये. भारताची टीम खूप चांगली आहे आणि दक्षिण आफ्रिकेची टीम पुन्हा एकदा रूळावर येत आहे. पण, भारतीय टीमनं त्यांना कमी लेखण्याची चूक केली.दक्षिण आफ्रिकेला सहज हरवू असा त्यांना अती आत्मविश्वास होता. टीम इंडियाच्या पराभवाचे हेच सर्वात मोठे कारण ठरले. IPL 2022 Mega Auction : ख्रिस गेलचा मोठा निर्णय, क्रिकेट फॅन्सची होणार निराशा गेल्या 4-5 वर्षात टीम इंडियाने वन-डे आणि टेस्ट क्रिकेटमध्ये दबदबा निर्माण केला आहे. ही दक्षिण आफ्रिकेची टीम देखील खूप चांगली खेळली. त्यांनी होम ग्राऊंडचा फायदा उठवला आणि विजय मिळवला. हा सर्वात मोठा आणि खास विजय आहे. कारण ही नवी टीम आहे. दक्षिण आफ्रिकेच्या नव्या टीमनं गेल्या अनेक वर्षांपासून दोन्ही फॉर्मेटमध्ये दबदबा असलेल्या टीमचा पराभव केला आहे.' असे ताहीरने स्पष्ट केले.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Cricket news, South africa, Team india

    पुढील बातम्या