मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IND vs SA: KL राहुलसाठी 2021 ठरलं यशस्वी, आफ्रिकेला हरवल्यानंतर सागिंतलं यशाचं रहस्य

IND vs SA: KL राहुलसाठी 2021 ठरलं यशस्वी, आफ्रिकेला हरवल्यानंतर सागिंतलं यशाचं रहस्य

टीम इंडियाचा ओपनर केएल राहुल (KL Rahul) यावर्षी चांगलाच फॉर्मात आहे. सेंच्युरियन टेस्टमध्ये शतक झळकावणाऱ्या राहुलनं त्याच्या यशाचं रहस्य सांगितले आहे.

टीम इंडियाचा ओपनर केएल राहुल (KL Rahul) यावर्षी चांगलाच फॉर्मात आहे. सेंच्युरियन टेस्टमध्ये शतक झळकावणाऱ्या राहुलनं त्याच्या यशाचं रहस्य सांगितले आहे.

टीम इंडियाचा ओपनर केएल राहुल (KL Rahul) यावर्षी चांगलाच फॉर्मात आहे. सेंच्युरियन टेस्टमध्ये शतक झळकावणाऱ्या राहुलनं त्याच्या यशाचं रहस्य सांगितले आहे.

मुंबई, 31 डिसेंबर : टीम इंडियाचा ओपनर केएल राहुल (KL Rahul) यावर्षी चांगलाच फॉर्मात आहे. दक्षिण आफ्रिका सीरिजसाठी (India vs South Africa) त्याला टेस्ट टीमचा उपकर्णधार करण्यात आलेलं आहे. राहुलनं सेंच्युरियन टेस्टमध्ये शतक झळकावत त्याच्यावरील विश्वास सार्थ ठरवला. इंग्लंड दौऱ्यापासून बॅटींगमध्ये केलेला एक बदल हे यशाचे मुख्य कारण असल्याचे राहुले मॅचनंतर स्पष्ट केले.

ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा बॉल सोडण्याचा फायदा झाल्याचं राहुलनं यावेळी स्पष्ट केले. त्याने लॉर्ड्सवर याच पद्धतीनं खेळत शतक लगावलं होतं. त्यानंतर दक्षिण आफ्रिका विरुद्ध सेंच्युरियन टेस्टमध्येही तसाच खेळ करत यश मिळवले. त्याच्या शतकामुळेच टीम इंडियानं सेंच्युरियनमध्ये पहिल्यांदाच टेस्ट मॅच जिंकली आहे.

राहुलनं मॅचनंतर सांगितलं की, 'टेस्ट क्रिकेटमध्ये ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा बॉल सोडणे खूप महत्त्वाचे आहे. त्याचा मी आनंद घेत आहे. वन-डे आणि टी20 मॅच खेळताना मैदानाच्या चारही दिशेनं फटकेबाजी करणे हा अविस्मरणीय अनुभव असतो. पण, टेस्ट क्रिकेटमध्ये तुम्हाला नियोजनबद्ध पद्धतीनं खेळ खेळावा लागतो. तसंच योग्य बॉलची वाट पाहणे आवश्यक असते.

या दोन्ही प्रकारात बॅटींग करणे हो ओझे वाटू लागले तर चुका होतात. मी यावर्षी इंग्लंडमध्ये टेस्ट मॅच खेळताना बचावात्मक पद्धतीनं बॅटींग करणे आणि त्यामधून बॉलर्सना थकवण्याचा पूर्ण आनंद घेतला. ' असे राहुल यावेळी म्हणाला.

इंग्लंडनंतर ऑस्ट्रेलियन टीममध्ये कोरोनाची एन्ट्री, प्रमुख खेळाडू पॉझिटिव्ह

केएल राहुलने सेंच्युरियन टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्ये 123 रनची शानदार खेळी केली. या मॅचमध्ये शतक करणारा तो एकमेव बॅटर आहे. केएल राहुलचं टेस्ट करियरमधलं हे सातवं शतक आहे. दुसऱ्या इनिंगमध्ये त्याने 23 रन केले.

First published:
top videos

    Tags: Cricket, Kl rahul, South africa, Team india