Home /News /sport /

IND vs SA 3ODI : राहुलने टॉस जिंकला, शेवट गोड करण्यासाठी टीम इंडियात 4 बदल

IND vs SA 3ODI : राहुलने टॉस जिंकला, शेवट गोड करण्यासाठी टीम इंडियात 4 बदल

दक्षिण आफ्रिका दौऱ्यात निराशाजनक कामगिरी केलेल्या टीम इंडियाचा आज (रविवार) अखेरचा सामना आहे. आता या दौऱ्यातील शेवटची वन-डे (India vs South Africa 3rd ODI) जिंकून क्लीन स्वीपची नामुश्की टाळण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न असेल.

    केपटाऊन, 23 जानेवारी : दक्षिण आफ्रिका दौऱ्यात निराशाजनक कामगिरी केलेल्या टीम इंडियाचा आज (रविवार) अखेरचा सामना आहे. या दौऱ्यात भारतीय टीमनं पहिली टेस्ट जिंकली. त्यानंतर सर्व गोष्टी प्रतिकूल ठरल्या आहेत. दक्षिण आफ्रिकेनं सर्वप्रथम टेस्ट सीरिजमध्ये 2-1 असा विजय मिळवला आता वन-डे सीरिजमध्येही 2-0 अशी आघाडी घेतली आहे. आता या दौऱ्यातील शेवटची वन-डे जिंकत (India vs South Africa 3rd ODI) क्लीन स्वीपची नामुश्की टाळण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न असेल. भारतीय बॅटर आणि बॉलर दोघांनीही या मालिकेत निराश केले आहे. पहिल्या वन-डेमध्ये विराट आणि धवन तर दुसऱ्या वन-डेमध्ये राहुल आणि पंत सेट झाल्यानंतर आऊट झाले. त्याचा टीमला फटका बसला. त्याचबरोबर भारतीय बॉलर्सना विकेट घेण्यासाठी देखील झगडावं लागत आहे. केपटाऊनमध्ये होत असलेल्या तिसऱ्या सामन्यात टीम इंडियाचा कॅप्टन केएल राहुलनं (KL Rahul) टॉस जिंकून पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. टीम इंडियात या सामन्यात 4 बदल करण्यात आले आहेत. आर. अश्निन, शार्दूल ठाकूर, भुवनेश्वर कुमार आणि व्यंकटेश अय्यर यांना वगळण्यात आले असून त्यांच्या जागी सूर्यकुमार यादव, जयंत यादव, प्रसिद्ध कृष्णा आणि दीपक चहरचा समावेश करण्यात आला आहे. टीम इंडियाचा संघर्ष सुरू असताना दक्षिण आफ्रिकेची टीम सध्या फॉर्मात आहे. बलाढ्य भारतीय टीमला पराभूत केल्यानंतर दक्षिण आफ्रिका क्रिकेट टीमचा आत्मविश्वास वाढला आहे. या सामन्यात टीम इंडियाला क्लीन स्वीप देण्याच्या इराद्यानं उतरणार असल्याचा इशारा दक्षिण आफ्रिकेचा कॅप्टन टेम्बा बाऊमानं दिला आहे. IND vs SA : टीम इंडियाविरुद्ध सीरिज जिंकल्यानंतर आफ्रिकेला धक्का, ICC नं सुनावली शिक्षा टीम इंडिया Playing 11 : केएल राहुल (कॅप्टन),  शिखर धवन, विराट कोहली, ऋषभ पंत, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, जयंत यादव, दीपक चहर, प्रसिद्ध कृष्णा, जसप्रीत बुमराह आणि युजवेंद्र चहल दक्षिण आफ्रिकेची Playing 11 : क्विंटन डी कॉक, यानेमन मलान, टेम्बा बऊमा (कॅप्टन), एडेन मार्करम, रासी व्हेन डर डुसेन, डेव्हिड मिलर, ड्वेन प्रिस्टोरियस,  एंडिले फेलुकवायो, केशव महाराज, सिसांदा मंगाला आणि लुंगी एन्गिडी
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: South africa, Team india

    पुढील बातम्या