मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IND vs SA: दक्षिण आफ्रिकेत कोरोनाच्या एका दिवसात दुप्पट केस, अनुष्का शर्मा म्हणाली...

IND vs SA: दक्षिण आफ्रिकेत कोरोनाच्या एका दिवसात दुप्पट केस, अनुष्का शर्मा म्हणाली...

दक्षिण आफ्रिकेत सध्या ओम्रिकॉन (Omicron) या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटनं गंभीर परिस्थिती निर्माण केली आहे. टीम इंडियाच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वी विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मा (Anushka Sharma) याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

पुढे वाचा ...

मुंबई, 2 डिसेंबर: दक्षिण आफ्रिकेत सध्या ओम्रिकॉन (Omicron) या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटनं गंभीर परिस्थिती निर्माण केली आहे. भारतीय क्रिकेट टीम (Team India) या महिन्यात या देशाच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात टीम इंडिया  3 टेस्ट, 3 वन-डे आणि 4 टी20 सामने खेळणार आहे. भारतीय टीमचा हा दौरा अनिश्चित असतानाच दक्षिण आफ्रिकेतून काळजीची बातमी आली आहे. आफ्रिकेत कोरोनाची स्थिती गंभीर झाली असून एकाच दिवसात दुप्पट झाल्या आहेत. दक्षिण आफ्रिकेतील  परिस्थितीवर टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीची (Virat Kohli) पत्नी अनुष्का शर्मानं (Anushka Sharma) प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

दक्षिण आफ्रिकेतील मीडिया रिपोर्टनुसार देशात बुधवारी 8561 नवे कोरोनाचे रूग्ण आढळले आहेत. एका दिवसापूर्वी ही संख्या 4373 होती. आफ्रिकेतील या परिस्थितीमुळे सध्या सर्व जग काळजीत आहे. अनुष्का देखील त्याला अपवाद नाही. अनुष्कानं तिच्या इन्स्टा स्टोरीवर ही बातमी शेअर करत 'ओह माय गॉड' अशी प्रतिक्रिया दिली आहे.

टीम इंडियाचा दौरा लांबणीवर!

टीम इंडिया नियोजित वेळापत्रकानुसार 9 डिसेंबर रोजी दक्षिण आफ्रिकेला रवाना होणार होती. मात्र माध्यमांमधील रिपोर्टनुसार हा दौरा आठवडाभरासाठी स्थगित केला आहे.  या दौऱ्यासाठी बीसीसीआयला अद्याप केंद्र सरकारची मान्यता मिळालेली नाही. त्यामुळे हा दौरा आठवडाभरासाठी स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यातील कानपूर टेस्ट संपल्यानंतर लगेच टीम इंडियाची या दौऱ्यासाठी निवड होणे अपेक्षित होते. दक्षिण आफ्रिकेतील परिस्थितीमुळे ही निवड अद्याप झालेली नाही.

IND vs NZ: रणजीमध्ये ट्रिपल सेंच्युरी, IPL मध्ये शेवटच्या बॉलवर SIX, मुंबई टेस्ट गाजवण्यासाठी भारतीय सज्

बीसीसीआय या विषयावर क्रिकेट साऊथ आफ्रिकेशी सातत्यानं चर्चा करत आहे. दक्षिण आफ्रिकेच्या बोर्डानं टीम इंडियाची संपूर्ण काळजी घेण्याचं आश्वासन दिलं आहे.  यापूर्वी सप्टेंबर महिन्यात  इंग्लंड दौऱ्यातील पाचव्या टेस्टपूर्वी टीम इंडियात कोरोनाचा शिरकाव झाल्यानं भारतीय टीमनं ती टेस्ट न खेळण्याचा निर्णय घेतला होता.

First published:

Tags: Anushka sharma, Corona, Cricket news, South africa, Team india