Home /News /sport /

IND vs SA: टीम इंडियाच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याबाबत BCCI घेणार 'हा' निर्णय

IND vs SA: टीम इंडियाच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याबाबत BCCI घेणार 'हा' निर्णय

दक्षिण आफ्रिकेत ओमिक्रॉन (Omicron) या नव्या कोरोना व्हायरंटमुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक देशांनी सध्या आफ्रिकेशी संपर्क तोडला आहे. टीम इंडिया नियोजित वेळापत्रकानुसार या महिन्यात या देशाच्या दौऱ्यावर जाणार आहे.

    मुंबई, 2 डिसेंबर: दक्षिण आफ्रिकेत ओमिक्रॉन (Omicron) या नव्या कोरोना व्हायरंटमुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे अनेक देशांनी सध्या आफ्रिकेशी संपर्क तोडला आहे. टीम इंडिया नियोजित वेळापत्रकानुसार या महिन्यात दक्षिण आफ्रिकेला जाणार आहे. दोन्ही देशांची पहिली टेस्ट 17 डिसेंबर रोजी होणार आहे. आफ्रिकेतील गंभीर परिस्थितीचा विचार करता भारतीय क्रिकेट नियामक बोर्ड (BCCI) या दौऱ्याबाबत महत्त्वाचा निर्णय घेणार असल्याचं वृत्त आहे. 'क्रिकेट नेक्स्ट' नं दिलेल्या वृत्तानुसार टीम इंडियाचा दक्षिण आफ्रिका दौरा आठवडाभरासाठी लांबवणीवर टाकण्यात येणार आहे. या दौऱ्यासाठी बीसीसीआयला अद्याप केंद्र सरकारची मान्यता मिळालेली नाही. त्यामुळे हा दौरा आठवडाभरासाठी स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यातील कानपूर टेस्ट संपल्यानंतर लगेच टीम इंडियाची या दौऱ्यासाठी निवड होणे अपेक्षित होते. दक्षिण आफ्रिकेतील परिस्थितीमुळे ही निवड अद्याप झालेली नाही. रोहित शर्मा, केएल राहुल, ऋषभ पंत, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी हे टीम इंडियाचे प्रमुख खेळाडू न्यूझीलंड विरुद्धच्या टेस्ट सीरिजमधून बाहेर आहेत. या सर्वांची दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी निवड निश्चित आहे. या सर्वांना अद्याप बीसीसीआयच्या सूचनेची प्रतीक्षा आहे. बायो-बबलच्या बाहेर असणाऱ्या सर्व खेळाडूंना दक्षिण आफ्रिकेला रवाना होण्यापूर्वी 8 दिवस क्वारंटाईन राहणे आवश्यक आहे. बीससीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी हा दौरा होणार असल्याचे संकेत यापूर्वी दिले होते. 'दक्षिण आफ्रिका दौरा नियोजित वेळापत्रकानुसार होईल. कोरोनाचा नवा व्हेरिएंट समोर आल्यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीवर आमचं लक्ष आहे. आमच्याकडे निर्णय घेण्यासाठी अद्याप वेळ आहे. असा दावा गांगुली यांनी केला होता. मात्र सरकारकडून अद्याप मान्यता नसल्यानं बीसीसीआय नवा निर्णय घेण्याची शक्यता आहे. स्टार टेनिस खेळाडू महिनाभरापासून गायब, WTA नं केल्या सर्व स्पर्धा रद्द शार्दुल ठाकूरला न पाठवण्याचा निर्णय टीम इंडियाचा फास्ट बॉलर शार्दुल ठाकूर (Shardul Thakur) दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाणार नाही. इंडिया ए विरुद्ध दक्षिण आफ्रिका ए (India A vs South Africa A) या टीममध्ये सध्या तीन अनधिकृत टेस्ट मॅचची सीरिज सुरू आहे. या सीरिजमध्ये सहभागी होण्यासाठी शार्दुल दुबईमार्गे दक्षिण आफ्रिकेला जाणार होता. मात्र बीसीसीआयनं त्याला न पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. शार्दुल 6 डिसेंबरपासून सुरू होणारी तिसरी अनधिकृत टेस्ट खेळणार होता. त्यापूर्वी त्याला आफ्रिकेत 3 दिवस क्वारंटाईन राहावे लागणार होते. ओम्रिकॉनच्या सावटात इंडिया ए विरुद्ध दक्षिण आफ्रिका A यांच्यातील दुसरी अनधिकृत टेस्ट सध्या सुरू आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Cricket news, South africa, Team india

    पुढील बातम्या