Home /News /sport /

IND vs SA: ऋतुराजबाबत फार उशीर करू नका, दिग्गज क्रिकेटपटूचा निवड समितीला सल्ला

IND vs SA: ऋतुराजबाबत फार उशीर करू नका, दिग्गज क्रिकेटपटूचा निवड समितीला सल्ला

सध्या जबरदस्त फॉर्मात असलेल्या ऋतुराज गायकवाडची (Rururaj Gaikwad) दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी टीम इंडियात निवड व्हावी इतकंच नाही तर त्याला पुरेशी संधी मिळावी असा सल्ला दिग्गज क्रिकेटपटूने निवड समितीला दिला आहे.

    मुंबई, 13 डिसेंबर : सध्या जबरदस्त फॉर्मात असलेल्या ऋतुराज गायकवाडची (Rururaj Gaikwad) दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठीच्या टीम इंडियात निवड व्हावी इतकंच नाही तर त्याला पुरेशी संधी मिळावी, असं मत निवड समितीचे माजी अध्यक्ष आणि दिग्गज क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर (Dilip Vengsarkar) यांनी व्यक्त केले आहे. ऋतुराजने सध्या सुरू असलेल्या विजय हजारे ट्रॉफीत (Vijay Hazare Trophy) सलग तीन मॅचमध्ये शतक झळकावलं आहे. वेंगसरकर यांनी 'टाईम्स ऑफ इंडिया' शी बोलताना ही प्रतिक्रिया दिली आहे. 'फॉर्ममध्ये असणाऱ्या खेळाडूची निवड करायला हवी. त्याने आणखी किती रन करण्याची आवश्यता आहे. निवड समितीने त्याला निवडण्याची आणि थेट टीममध्ये संधी देण्याची वेळ आली आहे.' असे वेंगसरकर यांनी सांगितले. टीम इंडियातील प्रमुख खेळाडू हे इंग्लंड दौऱ्यावर होते तेव्हा श्रीलंका विरुद्धच्या सीरिजमध्ये ऋतुराजची निवड झाली होती. पण, आगामी सीरिजमध्ये रोहित शर्मा, केएल राहुल, शिखर धवन आणि इशान किशन या खेळाडूंशी त्याची स्पर्धा आहे. त्यामुळे अंतिम 11 मध्ये त्याला संधी मिळण्याची शक्यता कमीच आहे. 'ऋतुराज तीन नंबरवरही बॅटींग करू शकतो. त्याला प्लेईंग 11 मध्ये संधी द्यायलाच हवी. तो काही 18 किंवा 19 वर्षांचा नाही. त्याचे वय 24 आहे. त्याला 28 वर्षांचा झाल्यानंतर घेण्यात काहीही अर्थ नाही.' असे वेंगसरकर यांनी स्पष्ट केले. रोहित शर्मानं कॅप्टन झाल्यानंतर विराट कोहलीबद्दल दिली पहिली प्रतिक्रिया! VIDEO ऋतुराजचा जबरदस्त फॉर्म ऋतुराज गायकवाडने या स्पर्धेत केरळविरुद्ध 124, छत्तीसगड विरुद्ध नाबाद 154 आणि मध्य प्रदेश विरुद्ध 136 रन करत सलग तीन शतक झळकावले आहेत. ऋतुराज गायकवाडसाठी 2021 हे वर्ष यशस्वी ठरले आहे. त्याने आयपीएल स्पर्धेत सर्वात जास्त 636 रन करत ऑरेंज कॅप पटकावली. सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत 5 मॅचमध्ये 150 पेक्षा जास्त स्ट्राईक रेटने 259 रन केले आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Cricket news, South africa, Team india

    पुढील बातम्या