मुंबई, 7 जानेवारी : केएल राहुलच्या (KL Rahul) कॅप्टनसीमध्ये टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेविरुद्धची (India vs South Africa) दुसरी टेस्ट पराभूत झाली आहे. या टेस्टनंतर तीन टेस्टची ही मालिका सध्या 1-1 ने बरोबरीत आहे. त्यामुळे टीम इंडियाला दक्षिण आफ्रिकेत टेस्ट सीरिज जिंकण्याचे आजवरचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी केपटाऊनमध्ये होणारी तिसरी आणि निर्णायक टेस्ट कोणत्याही परिस्थितीमध्ये जिंकणे आवश्यक आहे.
टेस्ट टीमचा नियमित कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) दुसऱ्या टेस्टमध्ये पाठ दुखावल्यानं खेळू शकला नाही. टीम इंडियाला जोहान्सबर्गमध्ये कॅप्टनची अनुपस्थिती जाणवली. आता तिसऱ्या टेस्टमध्ये विराट खेळणार का हा सर्वांसमोरचा मुख्य प्रश्न आहे. मॅच झाल्यानंतर टीम इंडियाचा हेड कोच राहुल द्रविडला (Rahul Dravid) हा प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी त्याने विराटच्या फिटनेसबाबत अपडेट माहिती दिली.
'विराट कोहलीनं नेटमध्ये सराव सुरू केला आहे. तो तिसरी टेस्ट खेळण्यासाठी फिट होईल, अशी आशा आहे, असे द्रविडने सांगितले. द्रविडच्या या वक्तव्यावरून टीम इंडिया नियमित कॅप्टनसह केपटाऊन टेस्ट खेळणार हे स्पष्ट झाले आहे. त्या परिस्थितीमध्ये मिडल ऑर्डरमधील एकाला विराटसाठी बेंचर बसावे लागेल.
टीम इंडियाचा पहिला पराभव
टीम इंडियाचा जोहान्सबर्गच्या मैदानावर टेस्टमध्ये पहिल्यांदाच पराभव झाला आहे. दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी 240 रनचे टार्गेट होते. ते त्यांनी 3 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केले. दक्षिण आफ्रिकेचा कॅप्टन डीन एल्गार (Dean Elgar) विजयाचा शिल्पकार ठरला. त्याने नाबाद 96 रन काढले.
बेन स्टोक्स क्लीन बोल्ड, तरीही नॉट आऊट, Video पाहून लावाल डोक्याला हात
टेम्बा बऊमा 23 रनवर नाबाद राहिला. रस्सी व्हॅन डर डुसेननेही 40 रनची, तर एडन मार्करमने 31 आणि कीगन पीटरसनने 28 रनची महत्त्वाची खेळी केली. या विजयासह दक्षिण आफ्रिकेने 3 टेस्ट मॅचच्या या सीरिजमध्ये 1-1 ने बरोबरी केली आहे. भारताकडून दुसऱ्या इनिंगमध्ये मोहम्मद शमी, शार्दुल ठाकूर आणि आर.अश्विन यांना प्रत्येकी 1-1 विकेट मिळाली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Rahul dravid, South africa, Team india, Virat kohli