Home /News /sport /

IND vs SA : केपटाऊमध्ये एकटा लढला विराट! टीम इंडियाच्या कॅप्टनचा फोटो होतोय Viral

IND vs SA : केपटाऊमध्ये एकटा लढला विराट! टीम इंडियाच्या कॅप्टनचा फोटो होतोय Viral

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (India vs Southa Africa) यांच्यातील तिसरी आणि निर्णायक टेस्ट सध्या केपटाऊनमध्ये सुरु आहे. या टेस्टच्या पहिल्या दिवशी विराट कोहली (Virat Kohli) विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातच सामना रंगला.

    मुंबई, 12 जानेवारी : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (India vs Southa Africa) यांच्यातील तिसरी आणि निर्णायक टेस्ट सध्या केपटाऊनमध्ये सुरु आहे. या टेस्टच्या पहिल्या दिवशी विराट कोहली (Virat Kohli) विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातच सामना रंगला. टीम इंडियाला पुन्हा एकदा मोठा स्कोअर करण्यात अपयश आले. भारतीय टीम पहिल्या इनिंगमध्ये 223 वर संपुष्टात आली. गेल्या काही दिवसांपासून टीकाकारांचं लक्ष्य असलेल्या विराट कोहलीनं मात्र 79 रनची झुंजार खेळी केली. दक्षिण आफ्रिकेच्या फास्ट बॉलर्सनी विराटची चांगलीच परीक्षा घेतली. विराटने शिस्तबद्ध खेळ करत त्यांना उत्तर दिले. विराटने तब्बल 201 बॉलचा सामना केला. त्याच्या खेळामुळेच टीम इंडियाला 200 रनचा टप्पा ओलांडता आला. या मॅचमधील एक फोटो सध्या व्हायरल (Photo Viral) होत आहे. त्यामध्ये विराट एकटाच दक्षिण आफ्रिकेच्या सर्व खेळाडूंसमोर उभा आहे. बॅटींग कोचने केली प्रशंसा विक्रम राठोड यांनी यावेळी टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीच्या खेळाची प्रशंसा केली. 'कोहली ज्या पद्धतीने बॅटींग करतो ते पाहाता त्यामध्ये कोणतीही चिंता नव्हती. तो नेहमीच चांगली बॅटींग करतो, असा माझा अर्थ आहे. एक बॅटींग कोच म्हणून मी कधीही तो चांगली बॅटींग करत नाही, अशी काळजी केलेली नाही.' असे राठोड यांनी सांगितले. IND vs SA: टीम इंडियाच्या खेळावर कोच नाराज, विराट कोहलीवर केलं मोठं वक्तव्य
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Photo viral, Team india, Viral photo, Virat kohli

    पुढील बातम्या