मुंबई, 22 जानेवारी : दक्षिण आफ्रिकेनं टेस्ट सीरिजनंतर टीम इंडियाला (India vs South Africa) वन-डे मालिकेतही हरवले आहे. पार्लमध्ये शुक्रवारी झालेल्या दुसऱ्या वन-डेमध्ये दक्षिण आफ्रिकेनं 7 विकेट्सनं विजय मिळवला. या विजयासह तीन सामन्यांच्या मालिकेत आफ्रिकेनं 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. या विजयानंतर दक्षिण आफ्रिकेचा कॅप्टन टेम्बा बऊमाने (Temba Bavuma) टीम इंडियाला टोला लगावला आहे.
बऊमाने मालिका विजयानंतर टीमची जोरदार प्रशंसा केली. 'आमच्या टीममधील खेळाडू मैदानात एकमेकांसाठी खेळतात हे आमच्या विजयाचे मुख्य कारण आहे. ही मालिका जिंकण्याचे आमचे सुरूवातीपासूनचे ध्येय होते. पण दोन मॅचनंतरच ते पूर्ण करू असे वाटले नव्हते. एक टीम म्हणून आम्ही विजयाचा शर्थीने प्रयत्न करतो. आम्ही सुपरस्टार्स किंवा एक-दोन खेळाडूंच्या चांगल्या कामगिरीवर अवलंबून नाही. आम्ही 2 मॅच जिंकून समाधान मानणार नाही. टीम इंडियाला क्लीन स्वीप देण्याचा आमचा प्रयत्न असेल.' असा इशारा त्याने दिला.
बऊमाने यावेळी विकेट किपर क्विंटन डी कॉक फॉर्ममध्ये परत येणे हा चांगला संकेत असल्याचे सांगितले. 'डिकॉक फॉर्मममध्ये परत येणे हे नक्कीच चांगले आहे. तो किती महत्त्वाचा खेळाडू आहे, हे त्याने पुन्हा एकदा दाखवले. माझ्या मते एक टीम म्हणून आमचा आमच्या क्षमतेवर विश्वास आणि आत्मविश्वास आहे.
IND vs SA : टेस्टनंतर वन-डेमध्येही राहुलची कॅप्टनसी फेल, सीरिज गमावल्याचं सांगितलं कारण
क्विंटन डी कॉकने शुक्रवारच्या सामन्यात 66 बॉलमध्ये 78 रन काढले. या खेळीबद्दल त्याचा 'प्लेयर ऑफ द मॅच' म्हणून निवड करण्यात आली. भारताने दिलेलं 288 रनचं आव्हान दक्षिण आफ्रिकेने 48.1 ओव्हरमध्ये पार केलं. जानेमन मलानने सर्वाधिक 91 रनची खेळी केली.. एडन मार्करम आणि रस्सी व्हॅन डर डुसेन प्रत्येकी 37 रनवर नाबाद राहिले. टेम्बा बऊमाने 35 रन केले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.