मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs SA, Weather Forecast: पहिल्या टेस्टवर काळे ढग, पाहा कसं आहे आजचं हवामान

IND vs SA, Weather Forecast: पहिल्या टेस्टवर काळे ढग, पाहा कसं आहे आजचं हवामान

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यातील पहिली टेस्ट सेंच्युरियनवर होणार आहे. विराट कोहलीच्या (Virat Kohli) कॅप्टनसीमध्ये टीम इंडिया दुसऱ्यांदा दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर आहे.

    मुंबई, 26 डिसेंबर : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यातील पहिली टेस्ट सेंच्युरियनवर होणार आहे. विराट कोहलीच्या (Virat Kohli) कॅप्टनसीमध्ये टीम इंडिया दुसऱ्यांदा दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर आहे. यापूर्वी 2017-18 साली भारतीय टीमनं या देशाचा दौरा केला होता. त्यावेळी झालेल्या तीन मॅचच्या सीरिजमध्ये टीम इंडियानं दोन टेस्ट गमावल्यानंतर तिसरी आणि शेवटची टेस्ट जिंकली होती. भारतीय क्रिकेट टीमला आजवर एकदाही दक्षिण आफ्रिकेत टेस्ट सीरिज जिंकता आलेली नाही. यंदा ही प्रतीक्षा संपवण्याची मोठी संधी आहे. या सीरिजसाठी रोहित शर्माला (Rohit Sharama) व्हाईस कॅप्टन म्हणून नियुक्त करण्यात आले होते. पण रोहितनं दुखापतीमुळे सीरिजमधून माघार घेतली. त्यानंतर केएल राहुलकडे (KL Rahul) ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मयांक राहुलसोबत टीम इंडियाच्या इनिंगची ओपनिंग करेल. 2 दिवस पावसाचा अडथळा सेंच्युरियन सुपर स्पोर्ट पार्कची पिच फास्ट बॉलिंगला मदत करणारी आहे. या मैदानात फास्ट बॉलर्लसना मिळणारा बाऊन्स आणि स्विंग बॅटर्सना अडचणीत आणणारा आहे.  हवानाम विभागाच्या अंदाजानुसार पहिले दोन दिवस या टेस्टमध्ये पावसाची शक्यता 60 टक्के आहे. तसेच वादळाची शक्यता देखील 40 टक्के आहे. तर तिसऱ्या दिवसापासून सूर्यप्रकाश स्वच्छ असेल, असा अंदाज आहे. IND vs SA ODI Series : टीम इंडियात 4 वर्षांनी होणार स्टार खेळाडूचं पुनरागमन! टीम इंडिया : विराट कोहली (कॅप्टन), केएल राहुल , मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत , रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, अजिंक्य रहाणे, ऋद्धिमान साहा, जयंत यादव, प्रियांक पांचाल, उमेश यादव, हनुमा विहारी आणि  इशांत शर्मा. दक्षिण आफ्रिका : डीन एल्गर (कॅप्टन), तेम्बा बावुमा, क्विंटन डिकॉक, कगिसो रबाडा, सरेल एरवी, बेउरन हेंड्रिक्स, जॉर्ज लिंडे, केशव महाराज, लुंगी एनगिडी, एडेन मार्कराम, वियान मुल्डर, कीगन पीटरसन, रासी वॅन डर डूसेन, काइल वेरेने, मार्को जेन्सन, ग्लेनटन स्टुरमॅन, प्रेनेलन सुब्रायन, सिसांडा मगला, रेयान रिकेलटन आणि  डुआने ओलिव्हर.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Cricket news, South africa, Team india, Weather forcast

    पुढील बातम्या