मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IND vs SA: पहिल्या टेस्टपूर्वी द्रविड करणार विराटचा बचाव, टीम मॅनेजमेंटचा मोठा निर्णय

IND vs SA: पहिल्या टेस्टपूर्वी द्रविड करणार विराटचा बचाव, टीम मॅनेजमेंटचा मोठा निर्णय

भारतीय टीम सध्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर (India vs South Africa) आहे. या मालिकेतील पहिली टेस्ट (Boxing Day Test) रविवारपासून सेंच्युरीयनवर सुरू होणार आहे

भारतीय टीम सध्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर (India vs South Africa) आहे. या मालिकेतील पहिली टेस्ट (Boxing Day Test) रविवारपासून सेंच्युरीयनवर सुरू होणार आहे

भारतीय टीम सध्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर (India vs South Africa) आहे. या मालिकेतील पहिली टेस्ट (Boxing Day Test) रविवारपासून सेंच्युरीयनवर सुरू होणार आहे

मुंबई, 25 डिसेंबर : भारतीय टीम सध्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर (India vs South Africa) आहे. टीम इंडिया सध्या 3 टेस्ट आणि 3 वन-डे सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेतील पहिली टेस्ट (Boxing Day Test) रविवारपासून सेंच्युरीयनवर सुरू होणार आहे. या टेस्टच्या आदल्या दिवशी होणाऱ्या पत्रकार परिषदेत विराट कोहली (Virat Kohli) सहभागी होणार नाही, असे वृत्त आहे. शनिवारी संध्याकाळी 4.30 वाजता ही पत्रकार परिषद होणार आहे.

या पत्रकार परिषदेत कोण सहभागी होणार हे अद्याप स्पष्ट नाही. मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) किंवा या मालिकेतील टेस्ट टीमचा उपकर्णधार केएल राहुल (KL Rahul) पत्रकार परिषदेत सहभागी होऊ शकतो. वास्तविक कॅप्टन कोहलीनं पत्रकार परिषदेला उपस्थित राहणे आवश्यक आहे. पण बॉक्सिंग डे टेस्टपूर्वी कोणत्याही वादाला तोंड फुटावे अशी टीम मॅनेजमेंटची इच्छा नाही, असे मानले जात आहे.

यापूर्वी दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाण्यापूर्वी विराटनं मुंबईत पत्रकार परिषद घेतली होती. त्या पत्रकार परिषदेनंतर क्रिकेट विश्वात चांगलाच वाद निर्माण झाला. या पत्रकार परिषदेत त्याने बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीचा (Sourav Ganguly) दावा फेटाळून लावला होता.

हरभजन राजकारणात जाणार की IPL टीमचा कोच होणार? वाचा भज्जीनं काय दिलं उत्तर

आम्ही विराटला टी-20 टीमची कॅप्टन्सी सोडू नकोस, असं सांगितलं होतं, पण विराट ऐकला नाही. निवड समितीला मर्यादित ओव्हरसाठी एकच कर्णधार असावा, असं वाटत होतं. त्यामुळे विराटला वनडे टीमच्या कॅप्टन्सीवरून हटवण्यात आलं, असं दादा म्हणाला. दादाचा हाच दावा विराटने फेटाळून लावला, त्यानंतर वादाला तोंड फुटलं. आता पहिल्या टेस्टपूर्वी आणखी कोणता वाद व्हावा अशी टीम मॅनेजमेंटची इच्छा नाही, त्यामुळे विराट पत्रकार परिषदेत सहभागी होणार नाही.

First published:
top videos

    Tags: Cricket news, Rahul dravid, Team india, Virat kohli