Home /News /sport /

IND vs SA: पहिल्या परीक्षेत कॅप्टन राहुल फेल, पराभवाची दिली 2 कारणं

IND vs SA: पहिल्या परीक्षेत कॅप्टन राहुल फेल, पराभवाची दिली 2 कारणं

केएल राहुलची (KL Rahul) कॅप्टन म्हणून ही पहिली वन-डे होती. या वन-डे सामन्यातही त्याला निराशा सहन करावी लागली. राहुलनं या पराभवाची दोन कारण दिली आहेत.

    मुंबई, 20 जानेवारी : टीम इंडिया वन-डे मालिकेची सुरूवात विजयानं करेल, अशी अनेकांची अपेक्षा होती. प्रत्यक्षात तसं झालं नाही. दक्षिण आफ्रिकेनं बुधवारी झालेल्या वन-डेमध्ये भारतीय टीमचा (India vs South Africa) 31 रननं पराभव केला. केएल राहुलची (KL Rahul) कॅप्टन म्हणून ही पहिली वन-डे होती. या वन-डे सामन्यातही त्याला निराशा सहन करावी लागली. राहुलनं या पराभवाची दोन कारणं दिली आहेत. राहुलनं मॅचनंतर सांगितलं की, 'हा एक चांगला सामना होता. आम्हाला बरंच शिकायला मिळलं. आम्ही चांगली सुरूवात केली होती. पण, मिडल ओव्हर्समध्ये विकेट घेऊ शकलो नाही. ते आम्हाला जड गेलं. मिडल ओव्हर्समध्ये विकेट घेऊन प्रतिस्पर्धी टीमला कसं रोखता येईल याचा विचार आम्हाला करावा लागेल. आम्हाला मिडल ओव्हर्समध्ये रन करता आले नाहीत. मॅचमधील पहिल्या 20-25 ओव्हर्स आम्ही बरोबरीत होतो. त्यावेळी हे टार्गेट सहज पूर्ण करू असे मला वाटले होते. पण, दक्षिण आफ्रिकेनं खरंच चांगली बॉलिंग केली आणि महत्त्वाच्या वेळी विकेट्स  घेतल्या. त्यानंतर आम्हाला पुनरागमन करता आलं नाही, अशी  दोन कारण राहुलनं या पराभवाची दिली आहेत. आम्हाला मिडल ओव्हर्समध्ये रन करता आले नाहीत, आम्ही 20 रन अतिरिक्त दिले. टीमनं काही काळापासून वन-डे सामने खेळलेले नाहीत. पण, 2023 चे वर्ल्ड कप हे आमचं ध्येय आहे. यासाठी बेस्ट-11 तयार करण्याचा आमचा प्रयत्न आहे. आम्ही चुका करू पण, त्यामधून शिकण्याचा प्रयत्न करू,' असे राहुलने स्पष्ट केले. IND vs SA : टीम इंडियाची पुन्हा निराशा, पहिल्या मॅचमधील पराभवाची 5 प्रमुख कारणं टीम इंडियाकडून  शार्दुल ठाकूरने (Shardul Thakur) मॅचच्या अखेरच्या बॉलला एक रन काढत आपलं अर्धशतक पूर्ण केलं. ठाकूरने 43 बॉलमध्ये नाबाद 50 रनची खेळी केली. यात 5 फोर आणि एका सिक्सचा समावेश होता. याशिवाय शिखर धवनने (Shikhar Dhawan) 79 आणि विराट कोहलीने (Virat Kohli) 51 रन केले. 50 ओव्हरमध्ये टीम इंडियाने 8 विकेट गमावून 265 रन केले. लुंगी एनगिडी, तबरेझ शम्सी, एनडिले पेहक्लुक्वायो यांना प्रत्येकी 2-2 विकेट, तर मार्करम आणि महाराजला 1-1 विकेट घेण्यात यश आलं.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Cricket news, Kl rahul, South africa, Team india

    पुढील बातम्या