मुंबई, 19 जानेवारी : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यातील पहिल्या वन-डेला आता थोड्याच वेळात सुरूवात होत आहे. टेस्ट सीरिजमध्ये पराभूत झाल्यानंतर टीम इंडिया या मालिकेत केएल राहुलच्या (KL Rahul) कॅप्टनसीखाली उतरणार आहे. विराट कोहलीला (Virat Kohli) या दौऱ्यापूर्वी वन-डे टीमच्या कॅप्टन पदावरून हटवण्यात आले होते. त्यानंतर विराट पहिल्यांदाच वन-डे सामना खेळणार आहे. त्यामुळे त्याच्या खेळाकडं सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.
विराट कोहली त्याच्या नव्या इनिंगची सुरूवात शतकानं करण्याचा प्रयत्न करेल. गेल्या दोन वर्षांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकही शतक विराटनं झळकावलेलं नाही. टेस्ट सीरिजमधील पराभवाला बॅटनं मलम लावण्याचा त्याचा प्रयत्न असेल. त्याचबरोबर या मालिकेपासून टीम इंडियाची 2023 साली होणाऱ्या वन-डे मालिकेसाठी तयारी सुरू होणार आहे.
India vs South Africa Dream11 Prediction:
विकेटकिपर - क्विंटन डी कॉक
बॅटर : केएल राहुल, विराट कोहली, शिखर धवन, रासी वान डर डूसान, टेंबा बावूमा
ऑलराउंडर: ड्वेन प्रिटोरियस, व्यंकटेश अय्यर
बॉलर: लुंगी एन्गिडी, जसप्रीत बुमराह, शार्दुल ठाकूर
IND vs SA: विराट कोहली पहिल्याच मॅचमध्ये मोडणार सचिनचा मोठा रेकॉर्ड
दोन्ही टीम
टीम इंडिया : केएल राहुल ( कॅप्टन ), जसप्रीत बुमराह, शिखर धवन, ऋतुराज गायकवाड़, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, वेंकटेश अय्यर, ऋषभ पंत, ईशान किशन, युजवेंद्र चहल, आर अश्विन, भुवनेश्वर कुमार, दीपक चाहर, प्रसिद्ध कृष्णा, शार्दुल ठाकुर, मोहम्मद सिराज, जयंत यादव आणि नवदीप सैनी.
दक्षिण अफ्रीका : तेम्बा बावूमा ( कॅप्टन ), केशव महाराज, क्विंटोन डिकॉक, जुबैर हमजा, मार्को जेनसन, जानेमन मलान, सिसांडा मगाला, एडेन मार्कराम, डेविड मिलर, लुंगी एन्गिडी, वेन पार्नेल, एंडिले फेहलुकवायो, ड्वेन प्रिटोरियस, तबरेज शम्सी, रासी वान डेर डुसेन आणि काइल वेरेन्ने.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.