Home /News /sport /

IND vs SA : टीम इंडियाची पुन्हा निराशा, पहिल्या मॅचमधील पराभवाची 5 प्रमुख कारणं

IND vs SA : टीम इंडियाची पुन्हा निराशा, पहिल्या मॅचमधील पराभवाची 5 प्रमुख कारणं

दक्षिण आफ्रिकेनं पहिल्या सामन्यात (India vs South Africa) टीम इंडियाचा 31 रननं पराभव केला. या बरोबरच आफ्रिकेनं 3 सामन्यांच्या या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. टीम इंडियाच्या या पराभवाची 5 प्रमुख कारणं आहेत.

    मुंबई, 20 जानेवारी : टीम इंडियानं  (Team India) दक्षिण आफ्रिका दौऱ्याचीा दमदार सुरूवात केली होती. टीमनं पहिली टेस्ट जिंकली होती, त्यानंतर पुढच्या दोन टेस्ट आणि मालिका गमावली. तसेच आता पहिल्या वन-डेमध्ये भारतीय टीमचा पराभव झाला आहे. दक्षिण आफ्रिकेनं पहिल्या सामन्यात  (India vs South Africa) टीम इंडियाचा 31 रननं पराभव केला. या बरोबरच आफ्रिकेनं 3 सामन्यांच्या या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. टीम इंडियाच्या या पराभवाची 5 प्रमुख कारणं आहेत. पहिलं कारण :  टीमनं प्लेईंग 11 मध्ये व्यंकटेश अय्यर (Venkatesh Iyer) या तरूण ऑल राऊंडरचा समावेश केला होता. पण, अय्यरला मॅचमध्ये एकही ओव्हर देण्यात आली नाही. अय्यरनं विजय हजारे स्पर्धेतील 6 सामन्यात 9 विकेट्स घेतल्या होत्या. कॅप्टन केएल राहुलनं (KL Rahul) ही मोठी चूक केली. राहुलनं फक्त 5 बॉलर्सचा वापर केला. यापैकी 3 जणांना एकही विकेट मिळाली नाही. दुसरं कारण : दक्षिण आफ्रिकेनं पहिल्या 3 विकेट्स 18 ओव्हर्समध्येच गमावल्या होत्या. त्यानंतर भारतीय बॉलर्सची लय हरपली. पुढची विकेट घेण्यासाठी त्यांना 30 ओव्हर्स प्रतीक्षा करावी लागली. त्यामध्ये तेम्बा बावूमा आणि रासी वेन डर डुसेन यांनी शतक झळकावत टीमला चांगली धावसंख्या उभारून दिली. तिसरं कारणं : अनुभवी भुवनेश्वर कुमारकडून (Bhuvneshwar Kumar) सुरूवातीच्या ओव्हर्समध्ये विकेटची अपेक्षा असते. त्याला एकही विकेट मिळाली नाही. लेग स्पिनर युजवेंद्र चहल देखील विकेट घेण्यात अपयशी ठरला. शार्दुल ठाकूरची बॉलिंग महागडी ठरली. अर्धा डझन खेळाडू कोरोनाग्रस्त झाल्यानंतरही टीम इंडियाची जबरदस्त कामगिरी, सुपर लीगमध्ये दिमाखात प्रवेश चौथं कारण : टीम इंडियाचा स्कोअर एकवेळेस 1 आऊट 138 होता. विराट कोहली (Virat Kohli) आणि शिखर धवन (Shikhar Dhawan) यांच्या अर्धशतकानंतर एकही बॅटर पिचवर टिकला नाही. पुढच्या 50 रनमध्ये 5 विकेट्स गेल्या. पाचवं कारण : दक्षिण आफ्रिकेच्या स्पिनर्सनी दमदार कामगिरी केली. त्यांनी 4 विकेट्स घेतल्या. तरबेज शम्सीनं 2 विकेट्स घेतल्या. त्यांच्या तीन स्पिनर्सनी भारतीय स्पिनर्सपेक्षा कमी रन दिले. शम्सीने विराट कोहलीचा तर केशव महाराजने शिखर धवनची विकेट घेतली. तर एडेन मार्करमने केएल राहुलला आऊट केले.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Cricket news, South africa, Team india

    पुढील बातम्या