VIDEO : INDvsPAK : पाकिस्तानचा खेळाडू करत होता धोकादायक गोलंदाजी, पंचांनी दिली ताकीद!

VIDEO : INDvsPAK : पाकिस्तानचा खेळाडू करत होता धोकादायक गोलंदाजी, पंचांनी दिली ताकीद!

ICC Cricket World Cup 2019 : IND vs PAK : पाकिस्तानचा गोलंदाज मोहम्मद आमिरने भारताचे तीन फलंदाज बाद केले.

  • Share this:

मँचेस्टर, 16 जून : इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या ICC Cricket World Cup स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात महामुकाबला सुरु आहे. भारताने प्रथम फलंदाजी करताना 5 बाद 336 धावा केल्या. हिटमॅन रोहित शर्माचे शतक, कोहली आणि केएल राहुलचे अर्धशतकाच्या जोरावर भारताने पाकिस्तानसमोर 337 धावांचं आव्हान उभा केलं. या सामन्यातील तिसऱ्याच षटकात पाकिस्तानचा वेगवान गोलंजदाज मोहम्मद आमीरला पंचांनी ताकीद दिली. मोहम्मद आमिरने पहिलं षटक निर्धाव टाकलं होतं. त्यानंतर पंचांनी दोन वेळा ताकीद दिली. तिसऱ्या षटकातील चेंडूवर डेंजर झोनमध्ये पोहचल्याबद्दल पुन्हा एकदा कल्पना दिली.

डेंजर झोन हा खेळपट्टीच्या मधोमध आयताकृती असतो. दोन फूट रुंदी आणि दोन्ही बाजूंनी पाच फूट आत अंतरावर हा झोन असतो. क्रिकेटच्या नियमानुसार गोलंदाजांना चेंडू टाकल्यानंतर या डेंजर झोनमध्ये जाण्यास बंदी असते.

भारताचा सलामीवीर शिखर धवन दुखापतीमुळे बाहेर असल्यानं त्याच्या जागी खेळणाऱ्या केएल राहुलनं सलामीला येऊन अर्धशतकी खेळी केली. त्याने रोहित शर्मासोबत अर्धशतकी भागिदारी करून दमदार सुरुवात करून दिली. केएल राहुल 57 धावांवर बाद झाला. त्याने रोहित शर्मासोबत 136 धावांची भागिदारी केली. त्यानंतर रोहित शर्माने शतक साजरं केलं. रोहित शर्माने 113 चेंडूत 140 धावा केल्या. यात त्याने 14 चौकार आणि 3 षटकार मारले.

रोहित शर्माने 85 चेंडूत शतक पूर्ण केलं. याखेळीत रोहित तीनवेळा धावबाद होण्यापासून वाचला. त्यानंतर पाकिस्तानच्या गचाळ क्षेत्ररक्षणाचा आणि दिशाहीन गोलंदाजीचा रोहितने समाचार घेतला. पाकिस्तानच्या गोलंदाजांनी पहिल्या 20 षटकांत एकदाही पायचितचे अपिल केलं नाही. त्यांना तशी संधीच भारतीय फलंदाजांनी दिली नाही. रोहित शर्मा बाद झाला तेव्हा भारताच्या 2 बाद 238 धावा झाल्या होत्या त्यानंतर मोहम्मद आमीरने भारताला तीन धक्के दिले. त्याने पांड्या, कोहली आणि धोनीला बाद केले. यामुळे अखेरच्या षटकात भारताच्या धावांना ब्रेक लागला.

वर्ल्ड कपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात आतापर्यंत 6 वेळा सामने झाले. यात सर्व सामने भारताने जिंकले आहेत. यंदा 12 वा वर्ल्ड कप होत असून भारताने दोनवेळा तर पाकिस्तानने एकदा विजेतेपद पटकावलं आहे. गेल्या सहा वर्षांपासून भारत पाकिस्तान यांच्यात द्विपक्षीय मालिका झालेली नाही. फक्त आयसीसीच्या स्पर्धेत दोन्ही संघ आमने सामने येतात.

रोहितनं उतरवली पाकची नशा, हायवोल्टेज सामन्यात झंझावती शतक

यांनी 147 धावांची भागिदारी केली होती. त्यानंतर यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये वॉर्नर-फिंच यांनी 146 धावा केल्या होत्या. World Cup India vs Pakistan: येथे पाहा महामुकाबला Live

VIDEO: World Cup: IND vs PAK; 'या' कलाकरांनी शेअर केला धम्माल वर्ल्ड कपचा अनुभव

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 16, 2019 07:43 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading