WTC Final : साऊथम्पटनमध्ये इशांत शर्माचं द्विशतक, दिग्गजांची केली बरोबरी

WTC Final : साऊथम्पटनमध्ये इशांत शर्माचं द्विशतक, दिग्गजांची केली बरोबरी

टीम इंडियाचा अनुभवी फास्ट बॉलर इशांत शर्मा (Ishant Sharma) याने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये (WTC Final) एक खास द्विशतक पूर्ण केले आहे. ही कामगिरी करणारा तो चौथा भारतीय बनला आहे.

  • Share this:

साऊथम्पटन, 21 जून: टीम इंडियाचा अनुभवी फास्ट बॉलर इशांत शर्मा (Ishant Sharma) याने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये (WTC Final) एक खास द्विशतक पूर्ण केले आहे. ही कामगिरी करणारा तो चौथा भारतीय बनला आहे. पावसाचा अडथळा आलेल्या या टेस्टच्या तिसऱ्या दिवसावर न्यूझीलंडचे वर्चस्व होते. पण या दिवसाच्या अखेरीस इशांतनं केलेला हा रेकॉर्ड त्याला आणि टीमला प्रेरणा देणारा आहे.

भारतीय टीम 217 रनवर ऑल आऊट होताच इशांतनं जसप्रीत बुमराहसह (Jasprit Bumrah) भारतीय बॉलिंगची सुरुवात केली. इशांतनं तिसऱ्या दिवशी 12 ओव्हर्स बॉलिंग करत फक्त 19 रन दिले. खराब प्रकाशामुळे खेळ थांबण्यापूर्वी इशांतनं मैदानात सेट झालेल्या डेवॉन कॉनवेला (Devon Conway) 54 रनवर आऊट केले. मोहम्मद शमीनं त्याचा कॅच घेतला. इशांतनं कॉनवेला आऊट करताच हा रेकॉर्ड पूर्ण केला.

इशांतनं विदेशातील टेस्टमध्ये 200 विकेट्स पूर्ण केल्या आहेत. ही कामगिरी करणारा इशांत हा चौथा भारतीय आहे.  इशांत आता कपिल देव, अनिल कुंबळे आणि झहीर खान या दिग्गज भारतीय बॉलर्सच्या गटात दाखल झाला आहे. विदेशातील टेस्टमध्ये भारताकडून सर्वात जास्त 269 विकेट्स अनिल कुंबळेनं घेतल्या आहेत. त्यानंतर कपिल देव यांचा नंबर आहे. त्यांनी 215 विकेट्स घेतल्या आहेत. तर झहीर खान 207 विकेट्ससह तिसऱ्या क्रमांकावर आहे.

रोहितला 'ते' करताना पाहून रितिका म्हणाली, 'आमच्यावर पाळत ठेवत आहेस का?'

न्यूझीलंडनं तिसऱ्या दिवसाच्या अखेरीस 2 आऊट 101 रन काढले आहेत. केन विल्यमसन (Kane Williamson) आणि रॉस टेलर (Ross Taylor) ही न्यूझीलंडची अनुभवी जोडी मैदानात आहे.खराब प्रकाशामुळे तिसऱ्या दिवशी अर्धा तास आधीच खेळ थांबवण्यात आला. दुसऱ्या दिवशी देखील 64.4 ओव्हर्स खेळ झाला होता.

Published by: News18 Desk
First published: June 21, 2021, 1:13 PM IST

ताज्या बातम्या